• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Entertainment

लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’

Khabarbat™ by Khabarbat™
January 30, 2026
in Entertainment, local News, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code
लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’ अधिक तीव्र; १० हजार स्वाक्षऱ्यांचा टप्पा पार!
चंद्रपूरच्या अस्मितेसाठी आणि व्याघ्र संवर्धनासाठी एकत्र येण्याचे ‘सेव्ह लोहरडोंगरी _सेव्ह ताडोबा’ मोहिमेचे आवाहन

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-पावनी-कऱ्हांडला, नवेगाव नागझिरा व गडचिरोली या ताडोबाच्या पूर्व व उत्तर दिशेकडील अतिशय महत्त्वाच्या व्याघ्र भ्रमणमार्गातील (Tiger Corridor) लोहरडोंगरी येथील प्रस्तावित लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी वन्यजीव प्रेमींनी पुकारलेल्या मोहिमेला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘स्टॉप लोहरडोंगरी माईन : सेव्ह ताडोबा-ब्रह्मपुरी टायगर कॉरिडॉर’ या नावाने सुरू असलेल्या ऑनलाईन याचिकेने (Online Petition) १० हजार स्वाक्षऱ्यांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, चंद्रपूरसह देशभरातून याला मोठा पाठिंबा मिळत आहे.

राज्य वन्यजीव मंडळाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाघांच्या मार्गिकेतील या खाणीला मंजुरी दिली. तज्ज्ञ सदस्यांनी केलेला विरोध डावलून वाघांचा अधिवास तोडणाऱ्या या लोहखनिज खाणीला मंजुरी प्रदान करण्यात आली.

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

लोह खाण प्रकल्पाचे भयावह वास्तव:
• हजारो वृक्षांची कत्तल: या प्रकल्पासाठी ३५.९४ हेक्टर आरक्षित वनक्षेत्रातील तब्बल १८,०२४ झाडे तोडली जाणार आहेत.
• व्याघ्र अस्तित्वावर घाला: ब्रह्मपुरी वनविभागातील जंगल घोडझरी अभयारण्यालगत असून, येथे ६० पेक्षा अधिक वाघांचा वावर आहे. हे महत्वाचे व्याघ्र कॉरिडोर नष्ट झाल्यास व्याघ्र संवर्धनाला मोठा तडा बसेल.
• मानव-वन्यजीव संघर्ष: गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. खाण प्रकल्पामुळे जंगलाचे तुकडे झाल्याने वाघ व बिबटे मानवी वस्तीच्या अधिक जवळ येतील, परिणामी हा संघर्ष अधिक भीषण होण्याची भीती आहे.
• ⁠मागील २०१५ या एका वर्षात जिल्ह्यात मानव वन्यप्राणी संघर्षात ४७ तर यापैकी १८ मृत्यू ब्रह्मपुरी वनविभाग मधे आहे
• पर्यावरणीय संकट: खाणकामामुळे हवा आणि पाण्याचे तीव्र प्रदूषण होऊन स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होणार आहे.

सहभागाचे आवाहन:
लोहरडोंगरीचा हा लढा केवळ पर्यावरणवादी किंवा वन्यजीव प्रेमींचा नसून, तो चंद्रपूरच्या भविष्याचा आहे. निसर्ग, जलस्त्रोत आणि भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन आपला विरोध नोंदवावा, असे आवाहन ‘सेव्ह लोहरडोंगरी _सेव्ह ताडोबा’ आणि चंद्रपूर-नागपूर येथील पर्यावरणवादी व वन्यजीव प्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.

“जिल्ह्यात आधीच कालवे, सिंचन प्रकल्प आणि रस्ते रुंदीकरणामुळे जंगलाचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे वाघांचे भ्रमणमार्ग विखंडीत झाले, त्यामुळे वाघ मानव संघर्ष वाढिस लागला आहे. मागील पाच वर्षात वाघ व इतर वन्यप्राणाच्या हल्ल्यात २०० मानवी बळी घेणाऱ्या वाघ-मानव संघर्षाला पुन्हा आमंत्रण देणे हा विकासाचा कोणता निकष आहे? सुमारे १० हजार नागरिकांनी या मोहिमेवर स्वाक्षरी करून सरकारला स्पष्ट संकेत दिला आहे की, आम्हाला खाण नको तर जंगल-निसर्ग समृद्ध हवे आहे. राज्य वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला घातलेल्या अटी ही केवळ निसर्गाची आणि संघर्षात असलेल्या या जिल्हयाची थट्टा आहे. जोपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
– बंडू धोतरे, माजी सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ

येथील प्रस्तावित खाण प्रकल्प हा केवळ विकासाचा मुद्दा नाही. तो येथील पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी जीवनावर थेट आघात करणारा गंभीर धोका ठरत आहे. या भागात वास्तव्यास असलेले नागरिक मानव-वन्यजीव संघर्षाचे दुष्परिणाम रोज अनुभवत आहेत. गेल्या एका वर्षातच या संघर्षात ४७ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीत खाण प्रकल्पाला परवानगी देणे म्हणजे या संकटात आणखी भर घालण्यासारखे आहे. कालवे, यांमुळे आधीच जंगलाचे तुकडे झाले सिंचन प्रकल्प, रस्ते रुंदीकरणा असून, मोठे मांसाहारी प्राणी ‘कोंडीत’ सापडले आहेत. परिणामी, मानव-वन्यजीव संघर्षाने अलीकडच्या काळात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता पर्यावरण, निसर्ग, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी या ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून देशपातळीवरील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 187
Tags: Chandrapurenvironment
SendShareTweetScan
Previous Post

…तर उद्याच ही व्यक्ती घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

Next Post

उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा