• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

Khabarbat™ by Khabarbat™
January 31, 2026
in Education, local News, Social
WhatsappFacebookTwitterQR Code

उखाण्यांच्या जुगलबंदीने रंगला सम्राट अशोक विद्यालयाचा हळदीकुंकू सोहळा.

महिला व विद्यार्थिनींच्या समस्यांवर झाले विचार मंथन.

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३१.
तीळ संक्रात महिलांसाठी एक उत्साहाचा सण असतो.महिला एकामेकाच्या घरी तिळगुळ घ्यायला जातात.महिला वर्गात या काळात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते.
महिलांसाठी खास असलेल्या या सणाचे औचित्य साधून नजीकच्या उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयात आज दि. ३१ जानेवारी रोज शनिवारला सकाळी ९.३० वाजता विद्यालयात महिला पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महिला व विद्यार्थिनींच्या समस्यांवर विचार मंथन झाले.
उपस्थित माता पालक महिलांनी व महिला मान्यवरांनी कार्यक्रमात घेतलेल्या उखा उखाण्यांनी आजचे हळदीकुंकू कार्यक्रम गाजवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरटोला ग्रामपंचायत च्या सरपंच कुरुंदाताई वैद्य ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सावरटोला ग्रामपंचायतच्या उपसरपंच सुवर्णाताई तरोणे, सामाजिक कार्यकर्त्या सरिता मेश्राम, ग्रामविकास अधिकारी रजनीताई शहारे,मुख्याध्यापक एस.एस.टेंभुर्णे,ग्रामपंचायत सदस्या भारती डोये,गीता नारनवरे,उर्मिला शिवणकर,कविता चचाणे,अरुणा फुंडे,अनिता वैद्य,उज्वला नंदागवळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आई आहे प्रेमळ दीर आहे हौशी, राजकुमार रावाचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. या उखाण्याने ग्रामपंचायत सदस्य भारतीय डोये यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली व कार्यक्रमात रंग भरला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सरिता मेश्राम यांनी चांदीच्या ताटात निवडीत होते जवस दूधग्राम रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस.
तर सावरटोला ग्रामपंचायतच्या उपसरपंच सुवर्णाताई तरोणे यांनी,शिवाजी सारखा राजा गादीवर बसला,विजयरावांचं नाव घ्यायला आशीर्वाद असला. हा उखाणा घेऊन कार्यक्रमाचे रंगत आणखी वाढवली.
ग्रामपंचायत सदस्य कविता चचाणे यांनी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी दादूरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. तर आभार नाही मरगळ नाही वीज चमकते ढगात अंतरामजींनी साडी घेतली कीर्ती गेली जगात असा नाविन्यपूर्ण निसर्गाचा महिमा गाणारा उखाणा माझी सरपंच गीता नारनवरे यांनी घेतला. जुन्या काळात महिला धार्मिक नैसर्गिक पार्श्वभूमी असलेले उखाणे घेत असत. आता काळ बदललेला आहे बदलत्या काळानुसार पारंपारिक उखाण्यात सुद्धा आजचे आधुनिक संदर्भ घेतले जातात याचा प्रत्यय या कार्यक्रमास आला. जय भीम चा गजर जसा आहे सर्वत्र नरेशजीचा मन आहे तसा निर्मळ पवित्र असा उखाणा अनिता वैद्य यांनी घेतला. उभी होते मळ्यात नजर गेली तळ्यात मोहन चीनच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष बोरटोला ग्रामपंचायतच्या सरपंच कुरुंदा वैद्य यांनी भारतामध्ये लोकप्रिय आहे क्रिकेट,इंद्रजीतरावांची घेतली मी विकेट या उखाण्याने महिला मेळाव्यात हास्याची कारंजी उडवली.
या मान्यवरांबरोबरच माता पालक मेळाव्यात उपस्थित पालकमाता विद्या गुढेवार,मालता पाऊलझगडे,विशाखा फुंडे,सोनल झिंगरे,सीमा सोनवाणे,निशा सूर्यवंशी,प्रतीक्षा साखरे,सीमा गजबे यांनी सुद्धा उखाणे सादर करून,माता पालक मेळाव्याची व हळदीकुंकू कार्यक्रमाची शोभा वाढवली.
उपस्थित महिलांनी यावेळी आपल्या मुला-मुलींच्या शैक्षणिक समस्या कडे लक्ष द्यावे.किशोरवयीन मुलांना समजून घ्यावे,त्यांच्या अडचणी आई म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून सोडवा.मुलींच्या शिक्षणात खंड पडता कामा नये.त्यांच्या नियमित अभ्यासाकडे लक्ष द्यावे.त्यांच्या शारीरिक,मानसिक समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे.
इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेला सामोरे जातांना आपली मुले कॉपी विरहित परीक्षा देतील याकडे सर्व मातांनी लक्ष द्यावे.असे मार्गदर्शन व आवाहन महिला मान्यवरांनी यावेळी माता पालकांना केले.
माता पालकांना विद्यालयाच्या वतीन भेटवस्तू देऊन,अल्पोपहार व चहापानानंतर मेळाव्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.एस.टेंभुर्णे यांनी केले.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन पुनम तरोणे यांनी करून माता पालकांना बोलते करून,उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक एस.व्ही.बडोले, एच.एस.पात्रीकर,जे.एस.हटवार,एम.यु .घरोटे,इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनी अश्विनी राऊत,कोमल गुढेवार,भाविका दांडेकर, रिया गुढेवार,योगिता साखरे,मोहिनी गुढेवार,दुर्गेश्वरी सयाम,नंदिनी वैद्य, प्रतिज्ञा सयाम,मनीषा गुढेवार, लावण्या तरोणे,बापू पंचलवार,राकेश वालदे,गौरव चव्हाण,सीमा सोनवाणे, सोनल झिंगरे यांनी सहकार्य केले.

Post Views: 168
SendShareTweetScan
Previous Post

लोहरडोंगरी खाण प्रकल्पाविरोधातील ‘ऑनलाईन जनआंदोलन’

Next Post

सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Load More
Next Post
सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती

सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा