तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.
वडेगावबंध्या जंगलातील घटना.
दोन दिवसात दोन वाघाच्या हल्ल्याच्या घटना.
नागरिक संतप्त.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१०.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावबंध्या येथे आज रविवार (दि.१०) ला सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिचा जीव घेतला.कौशल्या हरीदास रहाटे (वय ६५ वर्ष)राहणार वडेगावबंध्या असे मृतक महिलेचे नाव आहे.सदर घटना सकाळी ९.०० वाजता लगतच्या जंगलात घडली.
बोंडगाव सूरबनलगतच्या जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने शनिवारी (ता. ९) सकाळी सहाच्या सुमारास हल्ला केला होता,त्यात बोंडगाव सुरबन येथील सुनीता चंद्रकुमार हटवार ही ४७ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती.या वृत्ताची शाही वाळत नाही, तोच वाघाने आज रविवारला परत हल्ला करत एका वडेगाव बंध्या येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करीत महिलेचा जीव घेतला. मृतक कौशल्य ह्या अंगणवाडी मदतनीस या पदावरून मार्च महिन्यात सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यामुळे त्या उदरनिर्वासाठी तेंदु पत्ता संकलनासाठी गेल्या होत्या.हे येथे उल्लेखनीय आहे.
त्यामुळे परिसरातील उदरनिर्वांसाठी तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांवर मोठे संकट कोसळले आहे.या हंगामात परिसरात आर्थिक प्राप्तीचे तेंदूपत्ता संकलन हे मोठे साधन असते. रोजगार हमीचे कुठलेही काम सध्या सुरू झाली नसल्याने परिसरातच नव्हे तर संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातच हा एक मोठा आर्थिक आधार सध्या शेतकरी शेतमजुरांना आहे.
काल व आजच्या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
काल शनिवार रोजी वाघाने हल्ला करून बोंडगाव सुरबन येथील सुनिता हटवार या महिलेला वाघाने हल्ला करीत गंभीर जखमी केले होते.आज रविवारला सकाळी पुन्हा वडेगाव बंध्या येथील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या कौसल्या राहटे या महिलेवर वाघाने हल्ला करून तिचा बळी घेतला.
सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने पहाटेपासूनच मोठ्या संख्येने महिला व पुरुष जंगलात जात आहेत. मृतक कौशल्या रहाटे ही आज रविवारी सकाळी अन्य महिलांसोबत नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी गावाजवळील जंगल परिसरात गेली होती.
गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र केशोरी वडेगाव बंध्या कक्ष क्रमांक २८२ येथे तेंदुपत्ता तोडतअसताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.कौसल्या हिने आरडाओरड केल्यानंतर सोबत असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत धाडसाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कौसल्याची प्राणज्योत मालवली होती.महिलांचा गोंधळ आणि आरडाओरड ऐकून वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या महिलांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर बोंडगाव सूरबन, वडेगाव बंध्या तसेच आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मागील काही दिवसांपासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये विशेष भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी घडलेली बोंडगाव सुरबन येथील काल शनिवारी वाघाच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे तर आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वडेगाव बंद येतील ६५ वर्षीय महिलेचा बळी वाघाने घेतला. या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे या वाघाचा बंदोबस्त पिंजरे लावून बंदिस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान आज ठार झालेल्या कौशल्या रहाटे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी परिसराची पाहणी करीत वाघाचा माग घेण्याचे कार्य वन विभागाचे सुरू आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना पन्नास हजाराची मदत.
आज दिनांक १० मे रोज रविवारला सकाळी अंदाजे ०९:०० वाजताच्या सुमारास गोठाणगाव वनपरीक्षेत्र अंतर्गत वडेगाव बंध्या बीट मधील कक्ष क्रमांक ७७५ मध्ये वाघाच्या हल्ल्याची घटना घडली.
सदर घटनेमध्ये शोभा हरिदास रहाटे, वय ६५ वर्षे, रा. वडेगाव बंध्या ह्या या जंगल परिसरात गेलेल्या असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. सदर हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडल्या आहेत.
घटनेची माहिती प्राप्त होताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा व पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.सदर परिसरात गस्त वाढविण्यात आलेली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मौकास्थळी पाहणी केली असता परिसरात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा असल्याने स्पष्ट पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत.
तथापि, घटनास्थळावरील परिस्थिती व मृतदेहावरील जखमांच्या आधारे वाघाच्या हल्ल्याची शक्यता दिसून येत आहे.आर्थिक मदत म्हणून तात्काळ पन्नास हजार रुपये देण्यात आले.
सदर प्रकरणी पुढील आवश्यक कार्यवाही वन विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी हल्लेखोर वाघाला बंदिस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. अशी माहिती
वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव मिलिंद पवार यांनी दिली आहे.









Discussion about this post