नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.
२०२४ पासून मजुरांचे वेतन थकीत.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या गैर कारभार.
गढूळ पाण्याचा पुरवठा महिला आक्रमक.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१५.
नवेगावबांध ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी तणावपूर्ण वातावरणात पार पडली. गट क्रमांक १२९४ मधील १२० एकर जमीन प्रकरण,मालगुजारी तलावावरील बोटिंग परवानगी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मच्छीमार बांधवांचे नुकसान,२०२४ पासून मजुरांचे थकीत वेतन, गावाला गढूळ पाण्याचा पिण्याचा पुरवठा तसेच ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांवर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. विविध प्रश्नावर व ग्रामपंचायतच्या ठिसूळ कारभारावर संताप व्यक्त करत, ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या ग्रामसभेत प्रश्नावर ग्रामस्थांच्या जनक जन आक्रोश पाहायला मिळाला.
ग्रामसभेपूर्वी ग्रामस्थांनी शांततेत निषेध मोर्चा काढला होता.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामसभेत नागरिकांनी आरोप केला की, १२० एकर जमीन प्रकरणात ग्रामस्थ व सदस्यांना विश्वासात न घेता शिफारस पत्र देण्यात आले. यासंदर्भात २०१६ च्या ग्रामसभेतील ठरावाचाही उल्लेख करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते यांनी दि.६ मेला दिव्यांग बांधवांचा अपमान केला त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. हा ही मुद्दा ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला होता. ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सरपंच हिराताई पंधरे यांनी दिव्यांग बांधवांशी जे अपमान जनक वर्तन झाले त्याविषयी सभेत माफी मागितली.तेव्हा कुठे संतप्त झालेले ग्रामस्थ काही वेळ शांत झाले.
मालगुजारी तलावावरील बोटिंगला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित, ग्रामपंचायतीने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. बोटिंगमुळे मासेमारीवर मोठा परिणाम झाल्याचा आरोप मच्छीमार बांधवांनी केला.पूर्वी मोठ्या प्रमाणात मासे मिळत असताना आता उत्पादनात मोठी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०२४ पासून पर्यटन संकुलात वन व्यवस्थापन समिती ने देखरेखीच्या कामावर ठेवलेल्या मजुरांचे वेतन दिल्या गेले नाही असा मुद्दा तत्कालीन रोजंदारी मजूर वाघमारे व कु. अहिरे यांनी उपस्थित केला.यावरूनही सभेत बराच गोंधळ झाला.या रोजंदारी मजुरांची थकीत रोजी तात्काळ देण्यात यावी,असा ठराव ही ग्रामसभेने यावेळी संमत केला. वर सभेचे अध्यक्ष सरपंच हिराताई पंधरे यांनी वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न सोडविण्यात येईल.असे आश्वासन यावेळी दिले.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही ग्रामस्थ आक्रमक झाले.तलावातील पाणी इतर गावांना शुद्ध करून पुरवले जात असताना नवेगावबांध गावकऱ्यांना गढूळ पाणी मिळत असल्याची तक्रार करण्यात आली.
तसेच तलाव परिसरातील छोट्या व्यावसायिक महिलांच्या उपजीविकेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.
ग्रामसभा सुरू असतानाच अनेक युवक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.जनतेच्या
भावना पायदळी तुडवणारे निर्णय आम्हाला मान्य नाहीत असा इशारा देत गावकऱ्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली.काही नागरिकांनी थेट आरोप केला की,गावातील प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामसभा ही लोकशाहीची ताकद आहे, ती कुणाच्या मर्जीवर चालणार नाही, असा आक्षेप घेत संतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, वनव्यवस्थापन समितीच्या जमा-खर्चावरूनही सभेत गोंधळ निर्माण झाला.संबंधित ठरावाचे वाचन न करताच सभा संपल्याचे जाहीर करण्यात आल्याने व सभेचे अध्यक्ष सरपंच हिराताई पंधरे ह्या सभेतून उठून गेल्याने,ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.ग्रामसभा संपल्यानंतरही ग्रामपंचायत परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम होते.सरपंच हिराताई पंधरे व त्यांच्या मर्जीतील एक ग्रामपंचायत सदस्य हे दोघेच ग्रामपंचायतचा कारभार पाहतात, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीनेच निर्णय घेतात,असा आरोप करून ग्रामपंचायतचे इतर सदस्य व्यासपीठावर न बसता ग्रामस्थांमध्ये बसले होते.हे येथे उल्लेखनीय आहे. मागील आठवड्यात सरपंचावर अविवास अविश्वास ठराव आणण्यात आला होता.तो बारगडला होता.हे विशेष.
कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या वतीने तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.













Discussion about this post