प्रियदर्शनी इंदिरा गांधी
सर्वां विषयी मनात प्रेम
महिला पंतप्रधान पहिल्या
भारताच्या आयरन लेडी नेम
काँग्रेस पक्षाच्या प्रमुख
कार्य प्रणाली प्रामाणिक
देशाचा मान वाढविला
हिराच एक जणू माणिक
भाषण शैली कणखर
बोलण्यातून दिसे व्यक्तित्व
देशासाठी क्रांती घडवून
टिकवून ठेवले अस्तित्व
राजकारणी धैर्यवान महिला
कतृत्व त्याचे होते महान
अमर जाहले नाव तयांचे
प्रत्येक महिलेला अभिमान
स्मरण होताच आजही
आठवतो त्यांचा इतिहास
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी
सदा वंदनीय भारत देशास
*हर्षा भुरे, भंडारा*
प्रतिनिधी अजय राऊत
Discussion about this post