नागपूर, २ ऑक्टोबर २०२३: नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आकोली टर्निंग वर आज सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. अपघात आकोली टर्निंग वर झाला. अपघातात धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील एक वाहन अपघातग्रस्त झाले.
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात आज अड्याळी, उमरगाव, पाचगाव परिसरातील शेतीची पाहणी केली व सोयाबीन पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मा. ना. श्री. धनंजय मुंडे मंत्री कृषी महाराष्ट्र शासन यांचेसोबत मतदारसंघातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील अड्याळी व उमरगाव येथे सततच्या अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी ची पाहणी केली.
झालेल्या नुकसानीचा शासन निर्णयप्रमाणे तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली यावेळी सोबत श्री. कृपाल तुमाने, खासदार रामटेक लोकसभा, श्री. सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष भाजपा, श्री सुधीर पारवे माजी आमदार, श्री अनिल निधान, पदाधीकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#farmers #namoshetkarimahasammannidhi #dhanjaymunde #Maharashtra











Discussion about this post