‘महेश काळे अभंगवारी कार्यक्रम पहिल्यांदाच नागपूरमध्ये’
*नागपूर | १९ जुलै २०२५* – संगीत रसिकांसाठी एक आनंदाची बातमी! सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचा बहुप्रशंसित ‘अभंगवारी’ हा खास संगीतमय कार्यक्रम
पहिल्यांदाच नागपूरमध्ये होणार आहे.
हा कार्यक्रम *एकदंत क्रिएशन्स* या संस्थेने आयोजित केला असून सदर कार्यक्रम *१९ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता नागपूरमधील सुप्रसिद्ध सुरेश भट सभागृहात* पार पडणार आहे.
‘*अभंगवारी*’ या कार्यक्रमात महेश काळे *पंढरीच्या वारीचे दर्शन, प्रचलित अभंग, भावगर्भ रचना आणि काही अनवट रचनांमधून* सादर करतात. अभंगवारी या
कार्यक्रमाच्या माध्यमातून महेश काळे यांनी संपूर्ण जगभरात *भक्तिसंगीताची नवी ओळख निर्माण* केली आहे.
या संगीतमय कार्यक्रमाचे *सुत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते अमित खांडकेकर* करणार आहेत.
अजून एक आकर्षण म्हणजे *मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार उमेश पांचाळ* कार्यक्रमादरम्यान
*वारीची वेगवेगळी रूपे चित्रांच्या माध्यमातून मंचावर साकारणार* आहेत.
सदर कार्यक्रमास *केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी साहेब* तसेच *मध्य नागपूरचे मा. आमदार प्रवीणजी दटके* उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमाची *तिकिटविक्री सुरेश भट सभागृह येथे सकाळी ११ ते ७ पर्यंत* उपलब्ध आहे,
तसेच *फोन बुकिंग सुद्धा उपलब्ध आहे*.
*फोन बुकिंग क्रमांक:*
📞 ९४०४८२८६९३
📞 ९९६००३२०३८












Discussion about this post