• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Vidarbha

देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात. एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

Khabarbat™ by Khabarbat™
February 25, 2026
in Vidarbha
Oplus_131072

Oplus_131072

WhatsappFacebookTwitterQR Code

देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात.

एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ फेब्रुवारी.
अर्जुनी मोर तालुक्यातील देऊळगाव बोदरा परिसरात सोनेगावच्या जंगलात दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान दोन मोटरसायकल आमोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात भंडारा जिल्ह्यातील पालांदूर चौरास नजीकच्या ढिवरखेडा येथील रहिवासी मंगेश शिवनकर (वय अंदाजे ४० वर्षे) यांचा घटनास्थळीच करूण मृत्यू झाला.दोन्ही मोटरसायकली वेगात समोरासमोर एकमेकांवर आदळल्याने,अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर गंभीर जखमी दिगंबर जयदेव मडावी (वय ३० वर्षे) आणि गजेंद्र मारोती मेश्राम (वय २७ वर्षे ) दोघेही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहूरकुडा येथील रहिवासी आहेत.दोघांनाही तातडीने जवळील ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,अर्जुनी मोरगाव ते देऊळगाव बोदरा रस्त्यावरील देऊळगाव नजीकच्या जंगल परिसरातील धोकादायक वळणावर हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.
———————
*हे ठरले देवदूत*
*माहूरकुडा येथील रहिवासी व अर्जुनी मोरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर तागडे हे याच मार्गाने दुपारी सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान बोदरा येथील फायनल शंकरपट पाहायला जात असताना,त्यांना हे अपघाताचे दृश्य दिसले.त्यांनी आपली मोटरसायकल थांबवून जखमींच्या मदतीला ते धावून गेले.त्यांनी भ्रमणध्वनी करून १०८ क्रमांकावर डायल करून ॲम्बुलन्सची व्यवस्था करून गंभीर जखमींना रुग्णालयात पोहोचते केले. जणू ते या गंभीर जखमीसाठी देवदूतच ठरले.तसेच त्यांनी पोलिसांनाही या अपघाताची माहिती दिली‌.हे येथे उल्लेखनीय आहे.*

——————————————

ढिवरखेडा येथील रहिवासी मंगेश शिवनकर हे आपल्या स्वगावावरुन एमएच ३६,एएच,७३६५ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून अर्जुनी मोरगावला जात होते.तर माहूरकुडा येथील रहिवासी दिगंबर मडावी आपल्या साथीदारासोबत क्रमांक नसलेल्या मोटरसायकलने देऊळगाव बोदरा येथे जात होते.
घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ढिवरखेडा गावावर शोककळा पसरली असून मृतकाच्या शिवनकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या धोकादायक वळणावर यापूर्वी अनेकदा अपघात झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघात प्रवण स्थळी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Post Views: 211
SendShareTweetScan
Previous Post

Industrial Visit for IT Students Organized

Next Post

पोलीस भरतीसाठी आमिष दाखवून लाचेची मागणी केल्यास तक्रार करा.

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026
0
दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
Load More
Next Post
पोलीस भरतीसाठी आमिष दाखवून लाचेची मागणी केल्यास तक्रार करा.

पोलीस भरतीसाठी आमिष दाखवून लाचेची मागणी केल्यास तक्रार करा.

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा