पोलीस भरतीसाठी आमिष दाखवून लाचेची मागणी केल्यास तक्रार करा.
गोंदिया पोलीस अधीक्षकांचे जनतेला आवाहन.
संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.२६.
गोंदिया जिल्ह्यात,गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील एकुण ५९ पदासांठी सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे.
पोलीस भरतीत निवड करुन देण्याकरीता उमेदवारास किंवा त्याचे नातेवाईकास किंवा इतर कोणालाही कुणीही व्यक्ती,पोलीस खात्यातील किंवा खाजगी व्यक्ती आमिष दाखवुन लाचेची (पैश्याची किंवा ईतर कोणत्याही प्रकारे) मागणी करीत असल्यास त्वरीत पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांचेकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. असे आवाहन जनतेला पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे (भा.पो.से.) यांनी आज दि. २६ फेब्रुवारी गुरुवारला एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.
दि. ११ते २० फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात आलेली आहे. शारिरीक चाचणीचे निकषानुसार व नियमानुसार पात्र उमेदवारांची नजिकच्या काळात लवकरच लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे.शारिरीक चाचणी व लेखी परिक्षेच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करुन नियमानुसार पात्र उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
सदर प्रक्रिया सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत अत्यंत पारदर्शीपणे पार पाडण्यात येत असुन सदर
सदर पोलीस शिपाई भरतीत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा वशीला चालणार नाही. सदर भरती ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येत आहे. तरी कुणीही आमिषाला बळी पडु नये.
असे आवाहन करून आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीची गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे (भापोसे) भ्रमणध्वनी क्रमांक 8308277020, अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया भ्रमणध्वनी क्रमांक 7507133100, तसेच लाललुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया (7182) 251203, 9209041064 किंवा 1064 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.












Discussion about this post