हिल्यांदाच बघून तुला
मन माझे तुझ्यात गुंतले
कसं सावरू गं मनाला
रात्री स्वप्न तुझेच पडले
तुला बघितल्या शिवाय
करमत नाही सखे आता
सांग ना गं कधी जोडशील
माझ्या वेड्यामनाशी नाता
सखे, हसमुख तुझा चेहरा
वाटते मला गं हवाहवासा
तूझ्या प्रेमात वेडा झालो
जीव होतो माझं कासावीसा
कळलंच नाही सखे मला
तुझ्या प्रेमात कधी गुंतलो
तुला बघितल्या पासून
मी तुझा प्रेमवेडा झालो
सखे, तूझ्या प्रेमात गुंतलो
तुझ्याविना जीवन अधुरा
एक होऊन आपण आता
करू प्रेमाचा दिवस पुरा
*कवी :- मा. अजय राऊत*
*मो. नं.8999661685*
Ajay raut
Discussion about this post