• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Maharashtra

काँग्रेस उमेदवार संतोष रावतांच्या कार्यकर्त्यांचा सुधीर मुनगंटीवारांवर हल्ल्याचा प्रयत्न

Khabarbat™ by Khabarbat™
November 19, 2024
in Maharashtra, Politics, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट मा. मंत्री व महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

लाडक्या बहिणी धावल्या सुधीरभाऊंच्या सुरक्षेसाठी…
काँग्रेस—भाजपात राडा होण्याचे कारण अगदीच क्षुल्लक होते. सुधीरभाऊ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तलावाच्या कामासंदर्भात मदत करण्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी गावातला सरपंच काँग्रेसचा असल्याने तलावाचे दुरुस्ती काम रखडल्याची तसेच सुधीरभाऊंपर्यंत हा विषय पोहोचू देत नसल्याची तक्रार भाजपाचे कार्यकर्ते सुधीरभाऊंकडे करत होते. प्रचारादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना कोसंबी येथे जाता आले नव्हते. परंतु, प्रचार संपल्यानंतर कोसंबीला भेट दिली असता कार्यकर्त्यांबरोबर बैठकीत हा विषय समोर आला. त्यावेळी अनेक महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र, तेव्हाच मूलवरून काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत त्यांच्या समर्थकांसह तिथे पोहोचले आणि प्रचाराची वेळ संपल्यानंतरही, प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आचार संहितेचा भंग करीत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यासही सुरुवात केली.

वाचण्यासारखी बातमी

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; अशा दिल्या सूचना

येथे आता नि:शुल्क चित्रपट शुटींग करता येणार; मुनगंटीवार यांची घोषणा

इतके पैसे खर्चून केला उपचार; आता ती ऐकू लागली। हे मंत्री झाले त्यांच्यासाठी देवदूतच!

महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता वनभूषण पुरस्कार

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना शांतपणे समजावले की, आपण कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेत असून कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग करत नाही. तसेच, तुम्हाला हवे तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे, पोलिसांकडे तक्रार करू शकता. आणि, मी येथून गेल्यानंतर, तुम्हालाही येथे बैठक घेता येईल, माझी काही हरकत नसेल. परंतु, अशा प्रकारे मला जाब विचारण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर, संतोष रावत यांच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अंगावर जात आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा, मुनगंटीवार यांच्या अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांना धक्काबुक्की करणाऱ्यांच्या मध्ये अंगरक्षक आल्याने तिथे मोठा गोंधळ झाला. काही काँग्रेस कार्यकर्ते स्थानिक महिलांच्याही अंगावर धावून गेले. मात्र, सुधीरभाऊंच्या या बहिणींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बेदम चोप देत चांगलाच धडा शिकवला. तसेच, सुधीरभाऊंवर धावून गेलेल्यांनाही या महिलांनी त्यांची जागा दाखवून दिली.

काँग्रेसच्या उलट्या बोंबा..
काँग्रेस उमेदवार संतोष रावत व त्यांच्या समर्थकांनी कायदा हातात घेत स्वतःच निवडणूक आयोग असल्याप्रमाणे दादागिरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे, सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक घटनास्थळी येऊन वस्तुस्थिती जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण हलणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली. अखेर, पोलिस अधीक्षकांनी कोसंबीत येऊन मंत्री सुधीर मुनगंटीवारांची साक्ष नोंदवून घेतल्यानंतरच मुनगंटीवार चंद्रपूरला रवाना झाले.
या राड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने, भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवारांसह भाजपा कार्यकर्त्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करा, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मूल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. पहाटे चारच्या दरम्यान पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी मध्यस्थी करत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पांगले.

तक्रारींचे मार्ग सोडून राडेबाजी कशासाठी?
निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला असेल तर, त्यांच्यावर कारवाईचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आयोगाने अशा तक्रारींसाठी एका अॅपची निर्मितीही केली आहे. मुनगंटीवार यांनी आचार संहिता भंग केली होती तर, काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी हाकेवरच्या अंतरावर असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी किंवा पोलिसांत तक्रार का नोंदविली नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आयोगाने अॅपची सोय केली असल्यांने, स्थानिक कोसंबीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही अशी तक्रार करता आली असती. मात्र, मूल ते कोसंबी ५ किमी अंतर जाऊन स्वत: कायदा हातात घेत स्टंटबाजी करण्यामागे संतोष रावतांचा हेतू काय आहे? आधी पोलिसांवर विश्वास नाही असे सांगत आचार संहिता भंगाची तक्रार न नोंदविणारे संतोष रा

कोसंबीच्या सुधीर मुनगंटीवार यांचे बैठकीत महिला मोठ्या प्रमाणावर होत्या. यामुळेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ‘फार काही’ करता आले नाही. कारण या महिलाच आक्रमक झाल्यांचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. ‘कोसंबीच्या लाडक्या बहिणीच सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी सुरक्षेची ढाल झाल्याची’ चर्चा आता परिसरात आहे.वत राड्यानंतर, पोलिसांकडेच न्याय मागण्यासाठी कसे गेले? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

Post Views: 1,215
Tags: Sudhir mungantiwar
SendShareTweetScan
Previous Post

TGPCET Biotechnology Students Gain Hands-On Insights During Industrial Visit to Haldiram Foods

Next Post

जेएनएआरडीडीसी स्वच्छता ही सेवा अभियान 2024

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

May 9, 2026
0
Load More
Next Post
जेएनएआरडीडीसी स्वच्छता ही सेवा अभियान 2024

जेएनएआरडीडीसी स्वच्छता ही सेवा अभियान 2024

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा