• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

देशाचे भविष्य घडविण्यासाठी एकल अभियानाचे कार्य : प्र-कुलगुरू संजय दुधे

Khabarbat™ by Khabarbat™
January 24, 2024
in local News, Sports
WhatsappFacebookTwitterQR Code

देशाचे भविष्य घडविण्यासाठी एकल अभियानाचे कार्य : प्र-कुलगुरू संजय दुधे

*- एकल अभियानाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा थाटात समारोप*

*नागपूर.* देशाचे भविष्य मुले आहेत. एकल अभियान या मुलांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कौशल्य विकसीत करून त्यांना घडविण्याचे महान कार्य करत आहे. या समर्पित कार्यातून देश लवकरच विश्वगुरू बनेल, असा विश्वास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.संजय दुधे यांनी व्यक्त केला.

वाचण्यासारखी बातमी

नागपुरात १९ ते २२ जानेवारीला आदिवासी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

नागपूर : वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि योगा लाईफ सेंटरच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी

भविष्यात शिक्षकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करू : आमदार सुधाकर अडबाले

व्हॉलीबॉल स्पर्धा खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल : आमदार सुधाकर अडबाले 

एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका श्रीमती चित्राताई जोशी, एकल अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी श्री माधवेंद्र सिंह जी उपस्थित होते.

प्र-कुलगुरू प्रा. संजय दुधे यांनी खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. एवढ्या व्यापक प्रमाणात करण्यात आलेल्या आयोजनाबद्दल त्यांनी एकल अभियानाच्या कार्याचे देखील विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचे कार्य कठीण असून ते यशस्वीरित्या एकल ने पार पाडल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. खेळातून अनेक प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळते. नागपूर विद्यापीठाद्वारे अनेक गरजू प्रतिभावंत खेळाडूंना दत्तक घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात चित्राताई जोशी यांनी अयोध्या येथे झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, भारत ही भूमी स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. भारत हा देश एक मातीचा तुकडा नसून ती आई आहे. भारत माता आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न तयार करते. माणसाच्या तिन्ही आवश्यकता आपली मातृभूमी पूर्ण करते.  त्यामुळे याच मातीत खेळून खेळाच्या माध्यमातून आपला विकास करायचे ध्येय बाळगा. स्वत:च्या हितासाठी नव्हे तर देशासाठी सुवर्ण पदक जिंकू या ध्येयाने खेळण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले. श्रीमती चित्राताई जोशी यांनी खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पुरस्कार जिंकणा-या मीराबाई चानू यांचे उदाहरण देउन प्रोत्साहित केले.

तसेच चित्राताई जोशी यांनी यावेळी दुस-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोपाची घोषणा करण्यात करून पुढील वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद ओडिसाकडे देण्यात आल्याची देखील घोषणा केली.

*खेळाडूंनी घेतली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती*
पुरस्कार वितरणानंतर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर अयोध्या येथे सुरू असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या देशभरातील खेळाडूंनी यावेळी ‘जयश्रीराम’च्या घोषणा देत आनंद व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रमोद अग्निहोत्री यांनी केले तर आभार एकल ग्राम संगठनच्या सचिव दीपाली गाडगे यांनी मानले.
या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी एकल ग्राम संघटनच्या अध्यक्षा सौ. अरुणा पुरोहित, सचिव दीपाली गाडगे, कोषाध्यक्ष बागेश महाजन, रामचंद्र माताडे, निखिल गाडगे, वनबंधू परिषदेचे अध्यक्ष दिलीप जाजू, मनिदिदी गोयंका, दत्ता फडणवीस, विभाग उपाध्यक्ष डॉ. श्रीमती रेखा आमटे, विदुला पाठक, नीलिमा पौनीकर, ममता केडिया, शकुंतला अग्रवाल, उदय दामले, सुप्रिया मंगळूरकर, शुभदा तेलंग, स्वप्ना कुलकर्णी, कविता खेमका, सीमा अग्रवाल, सुनीता खानोरकर आदींनी कठोर परिश्रम घेतले.

*कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा दबदबा : वरघडे भावंडांना सुवर्णपदक*
एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्तीमध्ये महाराष्ट्रचा दबदबा राहिला. ४५ आणि ४८ किलो वजनगटात भावेश आणि अर्जुन वरघडे या दोन्ही भावंडांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली.
कुस्तीमध्ये ४५ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या भावेश अर्जुन वरघडे ने दक्षिण उत्तरप्रदेशच्या सुरज ला पछाडून सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर ४८ किलो वजनगटात गौरव अर्जुन वरघडे याने दक्षिण झारखंडच्या रोहित कुमारला चितपट देत विजय मिळविला.

*कबड्डीमध्ये उत्तराखंड, महाकौशलला विजेतेपद*
एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील कबड्डीच्या अंतिम सामन्यात महाकौशल संघाने मुलांमध्ये तर उत्तराखंड संघाने मुलींमधून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या स्पर्धेत महाकोशल संघाने ब्रजमंडल संघाचा ३२-२० असा पराभव केला. महाकौशल संघाचा सुखदेव उत्कृष्ट खेळाडू ठरला. मुलींमध्ये पूर्व उत्तरप्रदेश संघाला ४९-२३ ने नमवून उत्तराखंड संघाने विजेतेपद जिंकले. संघाची भूमिका उत्कृष्ट खेळाडू ठरली.

*निकाल*
कुस्ती
४५ किलो वजनगट : विजेता – भावेश अर्जुन वरघडे  (महाराष्ट्र), उपविजेता – सुरज (मध्य उत्तरप्रदेश)
४८ किलो वजनगट : विजेता – गौरव वरघडे (महाराष्ट्र), उपविजेता – रोहित कुमार (दक्षिण झारखंड)
५१ किलो वजनगट : विजेता – देवा (पश्चिम उत्तरप्रदेश), उपविजेता – कुलदीप यादव (मध्य उत्तरप्रदेश)
५५ किलो वजनगट : विजेता – धर्मराज (पूर्व उत्तरप्रदेश), उपविजेता – मोलायम कुमार (उत्तर बिहार)

*मुली : उंच उडी*
सिखामोनी पेगू (पूर्व पूर्वोत्तर) १.३५ मीटर, नेहा कुमारी (दक्षिण बिहार) १.३३ मीटर, प्रियंका कोराम (छत्तीसगढ) १.३० मीटर
*मुले : उंच उडी*
आर्यन कौशल (उत्तर हिमाचल) १.६३ मीटर, भूबन इंगटी (पश्चिम पूर्वोत्तर) १.५९ मीटर, करण कुमार (पूर्व उत्तरप्रदेश) १.५९ मीटर.

*मुली : २०० मीटर दौड*
सौमिका घोष (पं.बंगाल) २७.४८ सेकंद, रिशा सैकिया (पुर्वी पुर्वोत्तर) २८.३५ से., दिव्यांशी (पश्चिम उत्तरप्रदेश) २८.६६ से.
*मुले : २०० मीटर दौड*
राहुल पेगू (पुर्वी पुर्वोत्तर) २३.६० से., उज्ज्वल कुमार (पश्चिम उत्तरप्रदेश) २३.९२ से., अनूज सिंग (मध्य उत्तरप्रदेश) २४.११ से.

*मुली : ४०० मीटर दौड*
आरती यादव (पूर्व उत्तरप्रदेश) १.०४.५१ मि., सौमिका घोष (पं. बंगाल) १.०८.६० मि., रागिनी (दक्षिण उत्तरप्रदेश) १.०९.१३ मि.
*मुले : ४०० मीटर दौड*
लवलेश सरोज (दक्षिण उत्तरप्रदेश) ५३.११ से., अरूण कुमार (पश्चिम उत्तरप्रदेश), ५३.४८ से., बालचंद बेदिया (दक्षिण झारखंड) ५४.०७ से.

*योगासन*
पुरूष : हर्षित कुमार गौर (छत्तीसगड) ५०, आशिष कुमार नामेदव (महाकोसल) ४९.०५, आशिष कुमार (मध्य उत्तरप्रदेश) ४९.
महिला : डिम्पी गोगई हंडिके (पुर्वी पुर्वोत्तर) ४९.०५, पुष्पा देवी (दक्षिण उत्तरप्रदेश) ४९, सुप्रिया भारती (उत्तर बिहार) ४८.०५

Post Views: 1,415
Tags: sport
SendShareTweetScan
Previous Post

ताडोबात पर्यटकांसाठी आता या वाहनांना परवानगी

Next Post

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात नवी टीम; नियुक्तीनंतर विघ्नेश्वर काय म्हणाले?

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात नवी टीम; नियुक्तीनंतर विघ्नेश्वर काय म्हणाले?

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात नवी टीम; नियुक्तीनंतर विघ्नेश्वर काय म्हणाले?

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा