• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 23, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

Maharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात 2 जण गेले वाहून; राज्यात बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार

Khabarbat™ by Khabarbat™
July 20, 2024
in latest News, Maharashtra
Different Vehicles on Road Near Concrete Buildings

Photo by Alex Pham on Pexels

WhatsappFacebookTwitterQR Code
Maharashtra Rain: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जण वाहून गेले. उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना आज सकाळपासूनच्या मुसळधार पावसाने धो- धो धुतलंय. दरम्यान अजून देखील पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केले आहे. शनिवारी या अतिवृष्टीने नागपूरकरांना जाेरदार तडाखा दिला. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नागपुरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. ५०० च्यावर वस्त्या जलमय झाल्या. नागपूर जिल्ह्यातही शनिवारी मुसळधार पावसाने झाेडपले. काही तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल जलमय झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यात नांद धरणाचे ७ दरवाजे ३५ से.मी. ने उघडण्यात आले.

चंद्रपूर: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली. राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातसुध्दा ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक दहा वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत वाहून गेल्याची घटना घडली आहे. सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोधकार्य सुरू आहे. दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले. यापैकी 3 दरवाजे एक मीटरने तर 30 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले. धरणातून 1 लाख 12 हजार 921 लिटरने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली. पावसाने थोडी विश्रांती घेताच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

वाचण्यासारखी बातमी

lightning strikes | विजांचा कडकडाट होत असेल तेव्हा ही घ्या काळजी!

Rain Alert | चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस; या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले

सावली तालुक्यातील अनेक गावात वैनगंगा नदीच्या पुराने नुकसान

पावसाळ्यात ओले कपडे सुकवायचे कसे? जाणून घ्या

नागपूर येथील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय (डागा) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या शासकीय रुग्णालयांना पावसाच्या तडाख्याचा चांगलाच फटका बसला. मेडिकलच्या बऱ्याच वार्डात पाणी शिरल्याने रुग्णशय्येखाली पाणी साचले. या स्थितीतही रुग्णांवर उपचार केले गेले

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेले दोन ते तीन दिवस राज्याला मान्सूनचा तडाखा बसत आहे. मुंबई कोकण किनारपट्टीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सातत्याने पावसाचा मारा सुरु असल्याने शहरातील सखल भागात रात्रीपासून पाणी साचले आहे. मुंबईत 20 आणि 21 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा वेध शाळेने दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना धोकादायक पातळी ओलांडली आहे. मुंबईत रात्रीपासून सलग पाऊस कोसळत आहे.20 जुलै रोजी रात्री समुद्रात रात्री नऊ वाजताच्या दरम्यान भरती असल्याने समुद्र किनाऱ्यावर आठ ते दहा फूटांच्या लाटा उसळ्याचा अंदाज आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
——-

41 दिवसांनी लागणार आचारसंहिता
उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच, नुकतेच राज्यातील महायुती सरकारचे यंदाच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन पार पडले. त्यामध्ये, विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. त्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करुन महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यावरुन, विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही या योजनांवरुन सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंगच फुंकलं आहे.

Maharashtra rain marathi
Maharashtra rain today
Rainfall in Maharashtra 2024
Maharashtra Rainfall district wise
Maharashtra Rainfall data
Annual rainfall data Maharashtra
Circle wise Rainfall in Maharashtra
Yesterday rainfall in Maharashtra
Post Views: 1,138
Tags: Rain
SendShareTweetScan
Previous Post

गडचिरोलीत दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले

Next Post

दगड कोसळून महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026
0
Load More
Next Post
khabarbat watermark

दगड कोसळून महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा