• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, May 30, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur

Khabarbat™ by Khabarbat™
September 5, 2023
in latest News
WhatsappFacebookTwitterQR Code

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

जिल्हास्तरीय शांतता समितीवर प्रशांत विघ्नेश्वर व मजहर अली यांची नियुक्ती


चंद्रपूर, 5 सप्टेंबर 2023: चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांचा समावेश आहे.

या समितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सर्व आमदार, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी, जिल्हा साहित्य संघाचे प्रतिनिधी, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्हा महिला संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

या समितीचे मुख्य कार्य म्हणजे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे. यासाठी समिती वेळोवेळी बैठका घेऊन कायदेशीर मार्गाने आवश्यक उपाययोजना करेल.

पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर हे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत. ते चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव आहेत. मजहर अली हे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हास्तरीय शांतता समिती सदस्य

मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
मा. श्री. विजय वडेट्टीवार
मा. श्री. किशोर जोरगेवार
मा. श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर
मा. श्री. कितीकुमार (बंटी) भांगडिया
मा. श्री. सुभाष रामचंद्रराव धोटे
मा. श्री. सुधाकर अडबाले
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर
पोलीस अधिक्षक, चंद्रपूर
अति. पोलीस अधिक्षक / पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर, श्री. प्रविण उर्फ बाळू हेमचंद खोब्रागडे
श्री. सैय्यद रमजान अली सैय्यद अहेमदअली, पत्रकार चंद्रपूर
श्री. रामजिवनसिंह मनिरामसिंह परमार
श्री. सबेस्टीयन सुकर्तीक जॉन
अॅड. आशिष गोपाल मुंधडा
श्री. नरेंद्र लटारी बोबडे
प्रा. प्रियदर्शी वसंत मेश्राम
श्रीमती अंजली शंकरराव घोटेकर
श्रीमती शालीनी कमलेश भगत
श्री. अहेमद हुसेन पिर मोहम्मद अन्सारी
श्री. प्रकाश शंकरराव शेंडे
श्री. ईबादल मो. हुसेन सिद्दीकी
श्री. श्रीनिवास परशुराम जंगम
श्री. छोटुभाई उर्फ शेख जैरुद्दिन शेख मोहीद्दिन
श्री. रब्बानी गुलाम रसूल शेख
श्री. प्रविण धोंडूजी सुर
डॉ. संजय पुंडलिकराव पिठाडे
श्री. धनराज मुंगले
श्री. पंकज गाडीवार
श्री. उमाकांत गोविंदा माकोडे
प्रा. प्रकाश श्रावणजी बगमारे
डॉ. गणपत देवाजी देशमुख
श्री उपेंद्र चिटमलवार
श्री. धनंजय तुळशिराम बोरकर
श्री. नंदु कान्हुजी खोब्रागडे
श्री. सुभान सत्तार खॉ पठाण
श्री. संजय रघुनाथ पडोळे
श्री. अतुल किसन लेनगुरे
श्री. राजेंद्र अमृतलाल अढिया
श्री. विनोद मारोतराव देशमुख
श्री. राजु मंगल झाडे
श्री. उमाकांत आबाजी घोटे
श्री. काशीनाथ स्व
श्री. नसीर मोहमद रहीम बक्श (भुरूभाई)
श्री. प्रकाश शंकरराव उत्तरवार
श्री. अविनाश प्रभाकर रामटेके
श्री. पांडुरंग पत्र गावडे
श्री. शामराव शेडमाके
श्री. बबन गजानन पत्तीवार
श्री. मनोज कैकाळी भोजेकर
श्री. दिनेश राठोड
श्री. महेश बळीराम देवकते
श्री. भिमराव व्यंकटी पवार
श्री. पंकज तुकाराम पवार
श्री गणेश उत्तम कदम
श्री. मुनीर मकबूल शेख
श्री. देवेंद्र शंकरराव तुराणकर


चंद्रपूर जिल्ह्याचा शांततेचा नावलौकीक कायम ठेवा – जिल्हाधिकारी गौडा

Ø सण उत्सवात नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Ø शांतता समितीच्या बैठकीत सदस्यांकडून सामाजिक सलोखा व ऐक्याची ग्वाही

चंद्रपूर, दि. 5 : आगामी काळात जिल्ह्यात गोकूळाष्टमी, पोळा, गणपती, ईद असे विविध धर्मीय सण साजरे केले जाणार आहे. त्यातच गणपती विसर्जन आणि ईद हे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले जाते. चंद्रपूर जिल्हा आणि शहर हे सुरवातीपासूनच शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते. सर्वधर्मीय सण/ उत्सव येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्यामुळे हीच ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. तर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांनी चंद्रपूरचा सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित राहील, याची ग्वाही दिली.

नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

चंद्रपूरची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, एकाच दिवशी गणपती विसर्जन आणि ईद असल्यामुळे सर्वांनी मिरवणुकीच्या वेळा पाळाव्यात तसेच नियमांचे पालन करावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिरवणुकीचे रस्ते व्यवस्थित करून घ्यावे. डीजे / लाऊडस्पीकरचा आवाज 55 डेसीबलपेक्षा जास्त नसावा. ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गणपती मंडळांना सर्व परवानग्या देण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या रस्त्यावर बॅनर, फटाके, कमानी लावण्यात येऊ नये. वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे. दाताळा रोडवरील इरई नदीत गणपती विसर्जनाची व्यवस्था मनपाने योग्य प्रकारे करावी.

सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. विशेष करून तरुणांनी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या एखाद्या मॅसेजमुळे समाजभावना भडकणार नाही, यासाठी दक्ष असावे. जेष्ठ नागरिकांनी आपापल्या कुटुंबातील तरुणांना सोशल मिडीया वापराबाबत मार्गदर्शन करावे. सण / उत्सव हे आनंदाने आणि शांततेत पार पाडायचे असतात, याची सर्वांनी जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सामाजिक सलोखा आणि ऐक्य  ही चंद्रपुरची परंपरा आहे. सण / उत्सव आनंदाने साजरे करून जिल्ह्याचा लौकिक कायम ठेवावा. गणेश मंडळाने सामाजिक विषयांवर देखावे करावेत. तसेच शासकीय परवानग्या देतांना लोकांना चकरा माराव्या लागू नये, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाचे कान-नाक-डोळे : पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी

गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे पोलिस विभागाकडून प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मंडळाच्या बैठका घेणे सुरू आहे. यात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाने खरे कान-नाक-डोळे आहेत, असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ईद ची मिरवणूक ही सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तर गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दुपारी 3 नंतर काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर याबाबत मंडळनिहाय चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचा सामाजिक एकोपा अतिशय घट्ट आहे. तरीसुध्दा बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यात किंवा इतर ठिकाणी काही अघटीत घडल्यास त्याची प्रतिक्रिया चंद्रपुरात उमटू देऊ नका, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मनपातर्फे फिरते कुंड व निर्माल्य रथाचे आयोजन : आयुक्त विपीन पालीवाल

घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याकरीता चंद्रपूर शहरामध्ये 20 ते 30 कृत्रीम विसर्जन कुंडाचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच फिरते कुंड आणि निर्माल्य गोळा करण्यासाठी रथाचेसुध्दा नियोजन आहे. नागरिकांनी ईद मिरवणूक व गणपती विसर्जनावेळी रस्त्यावर बॅनर, स्वागत गेट, पताका लावू नये. आपापल्या मिरवणुकीच्या वाहनांवरच बॅनर लावावे. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात पीओपीच्या मुर्तींना बंदी आहे. त्यामुळे पीओपीची मूर्ती बनवितांना किंवा विक्री करतांना आढळल्यास त्वरीत तक्रार करावी. गणेश मंडळांना एक खिडकी योजनेंतर्गत परवानग्या देण्यात येत आहे. याबाबत काही अडचण आल्यास मनपा सभागृहात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.

   शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : पीओपी मुर्तीच्या संदर्भात मनपाने मुर्तीकारांची बैठक घ्यावी. गणेश मंडळांनी परवानग्या कशा घ्याव्यात, याबाबत जनजागृती करावी. सोशल मिडीयावर अफवा पसरणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी. मनपाने कृत्रीम विसर्जन कुंड तयार करावे. मुर्तीचे नुकसान / मोडतोड होऊ नये म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंडळांनी गणेश मुर्तीसाठीची वाहने सुव्यवस्थित ठेवावी तसेच चालक मद्यप्राशन करणारा नसावा. डीजेबद्दलच्या नियमांची माहिती पोलिस विभागाने आपापल्या क्षेत्रातील मंडळांना द्यावी. मनपाने मंडळांना पेंडालचा आकार निश्चित करून द्यावा. एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या एकाच वेळी देण्यात याव्या. विद्युत विभागाने पेंडॉलमधील इलेक्ट्रिक व्यवस्थेची पाहणी करावी. दाताळा रोडवरील इरई नदी येथे विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म तयार करावा. सण / उत्सवाच्या दोन-तीन दिवसांपासून दारूविक्री बंद ठेवावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी मानले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची रेल्वेच्या समितीवर नियुक्ती | Journalist Prashant Vigneshwar Railway Committee –

khabarbat News
Post Views: 709
SendShareTweetScan
Previous Post

वन नेशन वन इलेक्शन काय आहे नेमकी भानगड | One Nation One Election Update

Next Post

डिजिटल पत्रकारितेतून समाजाला न्याय देण्याचा संकल्प | digital journalism

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026
0
Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

March 24, 2026
0
Load More
Next Post
डिजिटल पत्रकारितेतून समाजाला न्याय देण्याचा संकल्प | digital journalism

डिजिटल पत्रकारितेतून समाजाला न्याय देण्याचा संकल्प | digital journalism

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
0
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
0
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
0
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL