आईची मिठी
सर्वात भारी
त्यात दिसते
दुनिया सारी
दिवस – रात्र
करते कष्ट
जगामध्ये ती
सर्वात श्रेष्ठ
आईची माया
असते स्वर्ग
आई मुळेच
जीवन मार्ग
वाटे जगात
मिळाला सर्व
आई बद्दल
असावा गर्व
आई प्रेमाची
ठेवा जाणीव
नाही जगात
वाटे उणीव
✍️✍️✍️✍️✍️
अजय राऊत
प्रतिनिधी अजय राऊत
Discussion about this post