• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

Khabarbat™ by Khabarbat™
April 12, 2026
in latest News, Vidarbha
Oplus_131072

Oplus_131072

WhatsappFacebookTwitterQR Code

देवरीच्या शहारे व जांभुळकर कुटुंबावर दुखा:चा डोंगर

संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१२.

वाचण्यासारखी बातमी

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Farewell 2K26 Celebrated with Enthusiasm at TGPCET Nagpur

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

काल शनिवारला (दि.११ एप्रिल) सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास नवेगावबांध-कोहमारा या राज्य महामार्गावर नवेगावबांध पासून एक किलोमीटर अंतरावर १४ चक्का ट्रेलर ट्रकने स्कुटीला दिलेल्या जबर धडकेत झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच करूण अंत झाला.तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

मृतक मुलाचे नाव अंकुर अरुण शहारे(वय १९ वर्षे) राहणार देवरी(जिल्हा गोंदिया), तर मुलीचे कु.रितिका संजय जांभुळकर (वय१२ वर्षे)राहणार चारभाटा,तालुका देवरी,जिल्हा गोंदिया,असे आहेत.

तर गंभीरपणे जखमी झालेल्या महिलेचे नाव अरुणा अरुण शहारे(वय ५० वर्षे) राहणार देवरी,जिल्हा गोंदिया. असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अरुणा शहारे ह्या देवरी वरून सायंकाळच्या सुमारास बोळदे येथील स्वगावी, विवाहाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी टि.व्ही.एस. कंपनीची ज्युपीटर स्कूटी क्रमांक एमएच-३५, एवाय-२००२ ने नवेगावबांधच्या दिशेने येत होत्या.

कोहमारा-नवेगावबांध राज्य महामार्गावर नवेगावबांध पासून १ किलोमीटर अंतरावर कोहमाराच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीचा ट्रेलर ट्रक क्रमांक- सीजी ०७, बीजी-७३०५ ने स्कुटीला दिलेल्या जबर धडकेत स्कुटीवर स्वार असणाऱ्या अंकुर व रितिका हे जागीच ठार झाले. तर अरुणा शहारे ह्या गंभीर रित्या जखमी झाल्या.

धडक एवढी जबर होती की मृतकांचे देह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडली होती. तर गंभीर जखमी अरुणा ह्या स्कुटीत अडकलेल्या होत्या.सदर अपघात सायंकाळी ६.४५ वाजता झाला.

अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक ड्रायव्हर घटनास्थळी न थांबता त्याने पोबारा केला.सदर ट्रकचा चालक हा मौजा परसोडी गावाजवळ ट्रक सोडुन पळुन गेल्याचे पोलीसांनी सांगीतले.

नवेगावबांध पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून परसोडी येथून ट्रेलर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

सदर ट्रेलर ट्रक वेगात होते,मला ओव्हरटेक करून हे ट्रक गेले व त्यांनी समोरून येणाऱ्या स्कुटीला जबर धडक दिली.असे प्रत्यक्षदर्शी रोषन धनिराम झोळे राहणार पांढरवाणी (झोडेटोली) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अपघाताची माहिती मिळतात पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.अरुणाला पोलीस गाडीतून ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.रोशन झोडे व अमोल कापगते यांनी मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये टाकून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे आणण्यात आले.

अरुणा अतिशय अत्याअवस्था असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालय गोंदियाला रवाना करण्यात आले.सध्या त्या गोंदिया येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.

या अपघातातील मृतक अंकुर शहारे हा देवरी येथील मनोहरभाई पटेल ज्युनिअर कॉलेजला इयत्ता १२ शिकत होता. मार्चमध्ये संपन्न झालेल्या बारावीची परीक्षा त्यांनी दिली होती.तर दुसरी मृतककु. रितिका जांभुळकर ही आपल्या मामीकडे देवरी येथे राहून मनोहरभाई पटेल विद्यालय देवरी येथील ४ थ्या वर्गात शिकत होती.

मृतक अंकुर हा गंभीर जखमी झालेल्या अरुणा शहारे यांचा एकुलता एक मुलगा होता.जखमी अरुणाचे पती बाबुराव मडावी विद्यालय देवरी येथे कार्यरत असताना कोरोना मध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

येथील ग्रामीण रुग्णालयात आज रविवार दि.१२ एप्रिलला सकाळी १०.१५ च्या दरम्यान शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

देवरी येथे स्थानिक मोक्षधामावर शोकाकुल वातावरणात मृतक अंकुर व रितिका यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.

अंकुर व रितिका यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहारे,जांभुळकर, कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देवरी,चारभाटा व बोळदे कवठा येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शी रोशन झोडे यांच्या तोंडी तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी अज्ञात वाहन चालक यांनी आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन सदर अपघाताला कारणीभूत ठरला.अपराध क्रमांक-९७/२०२६ कलम-१०६ (१),२८१,१२५(ब) भारतीय न्याय संहिता २०२३, सहकलम १८४,१३४(अ)(ब) मोटार वाहन कायदा.अन्वये फरार,अज्ञात वाहन चालका विरोधात नवेगावबांध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर अपघाताचा नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील पुढील तपास करीत आहेत.फरार वाहन चालकाला लवकरच अटक करण्यात येईल.असे पोलिसांनी सांगितले.

Post Views: 162
SendShareTweetScan
Previous Post

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

Next Post

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

March 24, 2026
0
Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

March 24, 2026
0
Load More
Next Post
बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

बोंडगाव सुरबन येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

National Level Tech Fest ‘ElectroKrat 2K26’ Electrifies TGPCET Nagpur with Innovation and Talent

May 18, 2026
तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

तीन अस्वलांच्या जीवघेण्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी.

May 16, 2026
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

नवेगावबांध येथील ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध प्रश्नांवर ग्रामस्थांचा आक्रोश.

May 15, 2026
पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

पर्यावरण संवर्धनासाठी ‘लँड स्टुड’; प्रकल्पाचा पुनर्वसनपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण

May 12, 2026
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

May 11, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा