*काटेरी कुंपण*
स्त्री जन्म आहे म्हणून
का घालतात बंधन??
घराबाहेर जाऊ नये म्हणून
घालतात काटेरी कुंपण
लग्नाआधी मायबाप
ठेवतात हो लई धाक
मुलगी आहे म्हणून ती..
कापणार नाही नाक
मनातल्या मनात ती
जपत असते सारी नाते
वेदना जाणून घ्या तिच्या
का टोचतात तिला काटे
स्त्री आहे म्हणून ती
नाही कोणाची गुलाम
स्त्री आहे शक्ती जगाची
करा नारी शक्तीला सलाम
तोडा तिच्या सभोवतालचे
सर्व बांधलेले काटेरी कुंपण
जगू द्या स्वच्छंदी मनाने
तिच करते घराचे संगोपन
*हर्षा भुरे, भंडारा*
Harsha bhure
Discussion about this post