khabarbat news | Nagpur | Patrakar Sangh
नागपूर: नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची सन 2023-25 या वर्षाकरिता निवडणूक घेण्यात येऊन पुढील कार्यकारणी घोषित करण्यात आली. कार्यकारणीत अध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी (विशेष प्रतिनिधी, लोकमत टाइम्स), सरचिटणीस पदी शिरीष बोरकर (विशेष प्रतिनिधी, द हितवाद) यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी परितोष प्रामाणिक (द हितवाद) व अनंत मुळे (तरुण भारत ) कोषाध्यक्षपदी मोरेश्वर मानापुरे (लोकमत), संघटन सचिवपदी पराग जोशी (तरुण भारत), सहसचिव पदी अनुपम सोनी (दै. हितवाद) व अभिषेक तिवारी नवभारत यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी सदस्यपदी हितेश लिंबाचिया (द हितवाद ) सुनील सोनी (लोकमत समाचार) निखिल दीक्षित (द हितवाद) किरण राजदेरकर (तरुण भारत ) हेमंत सालोटकर (तरुण भारत ) आनंद मोहरील (तरुण भारत ) हुमेरा मरियम (द हिदवाद) राजश्री यादव (लोकमत समाचार) यांचा समावेश आहे.
नवनियुक्त अध्यक्ष ब्रह्मशंकर त्रिपाठी यांनी यापूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्षपद व सरचिटणीस पदाची धुरा सांभाळलेली आहे.
प्रेस क्लबचे सरचिटणीस व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे ते कोषाध्यक्ष आहेत. *नवनियुक्त सरचिटणीस शिरीष बोरकर यांनी पत्रकार संघाचे अध्यक्षपद या आधी ९ वेळा व सरचिटणीस पद ५ वेळा सांभाळलेले आहे.*
ते नागपूर प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट सरचिटणीस आहेत. प्रेस क्लब येथे झालेल्या वार्षिक आमसभेत हा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी राज्य माहिती आयोगाचे नागपूर विभागाचे आयुक्त श्री राहुल पांडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त पत्रकार बसंत कुमार तिवारी, महेश उपदेव, मीरा टोळे, वर्षा तुपकर मदने व वर्षा बाशू यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार विश्वास इंदूरकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी पदाची तर वर्षा बाशू यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली. यावेळी व्यासपीठावर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके व अनिल गडेकर विशेष आमंत्रित होते.
Discussion about this post