चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार
एस्पॉयर सोशल फाउंडेशनतर्फे NEET, IIT-JEE आणि NDA साठी १००% स्कॉलरशिप जाहीर; १५ एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत.
चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी ग्रामीण भागातील टॅलेंटला आता आर्थिक टंचाईची अडचण भासणार नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ‘एस्पॉयर सोशल फाउंडेशन’ (ESF) या नामांकित स्वयंसेवी संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२८ या कालावधीसाठी NEET, IIT-JEE आणि NDA कोचिंगसाठी १०० विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत कोचिंग स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
नीती आयोगांतर्गत नोंदणीकृत असलेल्या (MH/2025/0864189) या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या पण आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे.
काय आहे ही स्कॉलरशिप?
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांना पुढील २४ महिने (२ वर्षे) स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासची संपूर्ण ट्युशन फी संस्था भरणार आहे. मात्र, यामध्ये निवास (Hostel), पुस्तके, प्रवास खर्च आणि परीक्षा फीचा समावेश नसेल. केवळ गुणवत्तेच्या जोरावर ही निवड केली जाणार आहे.
निवडीचे निकष आणि पात्रता:
गुणवत्ता: इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये किमान ८०% गुण असणे अनिवार्य.
आर्थिक मर्यादा: पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
जिद्द: संबंधित स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्याची तयारी आणि आवड असावी.
चारित्र्य: विद्यार्थ्याचे चारित्र्य निष्कलंक असावे (प्रवेशावेळी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक).
असा करा अर्ज:
इच्छुक विद्यार्थी, पालक किंवा शिक्षक आपले अर्ज ऑनलाईन किंवा पत्राद्वारे पाठवू शकतात. अर्जात विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, पत्ता, ८ वी व ९ वीचे गुण, पालकांचा व्यवसाय व उत्पन्न आणि संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन लिंक: https://forms.gle/WfKsvBDhPnJRZygK9
- ईमेल: project100Scholer@gmail.com
- अंतिम तारीख: १५ एप्रिल २०२६
- अधिक माहितीसाठी किंवा काही शंका असल्यास 7972715192 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एस्पॉयर सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.












Discussion about this post