• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, May 1, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

पती सेवानिवृत्त होताच पत्नी बनली महापौर

Khabarbat™ by Khabarbat™
February 10, 2026
in latest News, local News, Politics, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

पती सेवानिवृत्त होताच पत्नी बनली महापौर
संगीता खांडेकर यांची चंद्रपूरच्या महापौरपदी निवड

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांची अवघ्या एका मताने विजयी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा पुन्हा एकदा फडकला असून शहराच्या राजकीय वर्तुळात या निवडीची मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांचे पती राजेंद्र खांडेकर हे 31 जानेवारी रोजी आपल्या नोकरीच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील महानगर पालिका निवडणूक निकाल लाईव्ह

माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात खोदकामात पुरातन अवशेष

चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित अधीक्षक/अधीक्षिका संघटनेची नागपूर विभागीय सहविचार सभा 

महापौर निवडणुकीदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीनंतर संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्यामुळे भाजपाचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९७३ रोजी झाला. त्या मागील सुमारे ३० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी वार्डा-वार्डामध्ये जनसंपर्क साधत पक्ष बळकट करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत त्या मागील आठ वर्षांपासून नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मधून त्यांनी ५७४२ मते मिळवत ३२४२ मतांनी विजय संपादन केला होता. तसेच त्यांनी महानगरपालिकेत झोन सभापती पदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे.

२०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५, ओबीसी (अ) गटातून निवडणूक लढवून ४४३२ मते मिळवत तब्बल १९०० मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने त्यांची महापौरपदी दावेदारी अधिक भक्कम झाली.

संगीता खांडेकर यांचे पती राजेंद्र विठोबाजी खांडेकर हे देखील भारतीय जनता पक्षाचे मागील ४० वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून कुणबी समाजाचे मागील ३० वर्षांपासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.
राजेंद्र खांडेकर हे छोटूभाई पटेल हायस्कूल, शिवाजी चौक, चंद्रपूर येथे ३२ वर्षे कार्यरत होते. ३१ जानेवारी २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले. शिक्षकेतर संघटनेमध्ये त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

सौ. संगीता खांडेकर यांच्या शांत, मनमिळावू आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्या मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत. शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घेऊन चंद्रपूरचा सर्वांगीण विकास साधण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यांच्या निवडीमुळे शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर
उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड

चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांची महापौरपदी तर अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली.

महापौर पदासाठी एकूण १० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व वैशाली अजय महाडोळे, तर भारतीय जनता पक्षाकडून संगीता राजेंद्र खांडेकर व सारिका सचिन संदुरकर यांनी अर्ज सादर केले होते. अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या कालावधीत मनस्वी संदीप गिऱ्हे, संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व सारिका सचिन संदुरकर यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वैशाली अजय महाडोळे व भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांच्यात थेट लढत झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले असता वैशाली महाडोळे यांना ३१ तर संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाल्याने एका मताच्या फरकाने संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली.

उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी, तसेच भारतीय जनता पक्षाकडून संजय नारायण कंचर्लावार यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी संजय नारायण कंचर्लावार, वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी यांनी ठराविक कालावधीत आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रशांत आनंदराव दानव व प्रदीप शंकर देशमुख यांच्यात लढत झाली. मतदानात दोघांनाही प्रत्येकी ३२ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या एकमेव सदस्याने केवळ उपमहापौर पदासाठी मतदान केले असून महापौर पदासाठी तटस्थ भूमिका घेतली. वंचित बहुजन आघाडीचे दोन सदस्य निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित असल्याने ६६ पैकी ६४ सदस्यांनी निवडणुक प्रक्रियेत भाग घेतला.

या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कामकाज पाहिले. यावेळी महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,शहर अभियंता रवींद्र हजारे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 181
Tags: ChandrapurPolitical breaking
SendShareTweetScan
Previous Post

Logistics Job Vacancies : २०३० पर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४७ लाख नोकऱ्यांची गरज

Next Post

Industrial Visit for IT Students Organized

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
0
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
0
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
0
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026
0
Load More
Next Post
Industrial Visit for IT Students Organized

Industrial Visit for IT Students Organized

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा