मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
चंद्रपूर | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत आरक्षण नियम डावलल्याच्या विरोधात आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीने आंदोलन छेडले होते. १६ जानेवारीपासून समितीचे सदस्य मनोज पोतराजे आमरण उपोषणावर होते. अनेक आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली, मात्र ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले.
अखेर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनात हस्तक्षेप करत, आरक्षण डावलून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भरती प्रक्रियेत झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती दिली.


यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संपर्क साधत, भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या विनंतीनंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्ते मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे यांना लिंबूपाणी पाजून उपोषण समाप्त करण्यास मदत केली.
Discussion about this post