हडस्ती येथे जगन्नाथबाबा मूर्ती स्थापना वर्धापन सोहळा आज
![](https://i0.wp.com/khabarbat.in/wp-content/uploads/2023/12/USAM-SMART-DEVICES-PVT-LTD-1.jpg?fit=1280%2C720&ssl=1)
विसापूर : श्री जगद्गुरू जगन्नाथबाबा देवस्थान समिती हडस्तीच्या वतीने जगन्नाथबाबा मूर्ती स्थापनेचा दुसरा वर्धापन सोहळा ८ व ९ फेब्रुवारी रोजी गुरुवार आणि शुक्रवारी जगद्गुरू जगन्नाथबाबा मंदिर परिसर नवीन हडस्ती तालुका बल्लारपूर येथे साजरा करण्यात येत आहे. दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात ८ फेब्रुवारीरोजी सकाळी ४ वाजता घटस्थापनेने होईल. सायंकाळी ८ वाजता वरोरा येथील कीर्तनकार हभप सुरपाम महाराज यांचे कीर्तन आणि रात्री १२ वाजता जागृती भजन होत आहे. दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारीरोजी पहाटे ५ वाजता मारोती बाबा यांच्या हस्ते हवन व पूजा, सकाळी ९ वाजता पालखी सोहळा कार्यक्रम व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात परिसरातील हळदी, शिवनी चोर, मार्डा (मोठा), चारवट, कडोली, चार्ली, दीडशी मार्डा (लहान) बाबापूर, मानोली, रामपूर, राजुरा, नांदगाव पोडे, विसापूर, कोसारा, मात्रा, इरई, खामोना, अहेरी, साखरी, हिरापूर, कायर, पिपरी, धानोरा, वेंडली व चिचोली आदी गावातील भजन मंडळाला पाचारण करण्यात आले केले आहे. दरम्यान दुपारी १२ वाजता माँ कामाक्षी म्युझिकल ग्रुप नागपूर संगीत कार्यक्रम होणार असून,
Discussion about this post