Ashok Chavan : काँग्रेसचे महाराष्ट्रातील दोन वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा मंत्री, दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे दिगज्ज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. आज त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
त्यांच्या राजीनामा काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांनी आज (13 फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांची मराठवाड्यात प्रचंड ताकद आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महाराष्ट्रात भाजप आणखी ताकदवान होऊ शकतो. भाजप त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवू शकते, अशीही माहिती समोर येत आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली?
- चव्हाणांचा राजकीय प्रवास
अशोक चव्हाण 1986 ते 1995 या काळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस होते. त्यांनी 1999 पासून मे 2014 पर्यंत तीन टर्म महाराष्ट्र विधानसभेत काम केले. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 9 नोव्हेंबर 2010 रोजी काँग्रेस पक्षाने त्यांना आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. - 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चव्हाण नांदेड मतदारसंघातून निवडून आले, परंतु 2019 मध्ये भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. असा आहे
- २९ ऑक्टोबर १९५८ – मुंबई येथे अशोक चव्हाण यांचा जन्म
- १४ मे १९८२ : अमिता शर्मा यांच्याशी विवाह. त्यानंतर वडील माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राजकारणात प्रवेश
- १९८४ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस.
- मार्च १९८७ – नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत
- १९८९ : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या लाटेत डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याकडून पराभव.
- १९९२ : शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री.
- फेब्रुवारी १९९३ : विधान परिषदेवर नियुक्ती.
- ऑक्टोबर १९९९ : तत्कालीन मुदखेड विधानसभेतून ३५,०००च्या मताधिक्याने विजयी.
- २ नोव्हेंबर १९९९ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्र
- सप्टेंबर २००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री.
- ऑक्टोबर २००४ : मुदखेड मतदारसंघातून ७० हजार मतांनी विजयी. उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती.
- २००८ : राज्याचे मुख्यमंत्री
- ऑक्टोबर २००९ : नव्याने निर्माण झालेल्या भोकर मतदारसंघातून १ लाख मतांनी विजयी.
- नोव्हेंबर २००९ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री.
- मे २०१४ : नांदेड लोकसभा मतदारसंघातून ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी.
- २०१० : आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
- जानेवारी २०१७ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड.
- मे २०१९ : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून ४२ हजार मतांनी पराभव. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
- ऑक्टोबर २०१९ – भोकरमधून ५२,००० मतांनी विजय.
- ५ डिसेंबर २०१९ : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
- २०२२ – शिंदे गटाची बंडखोरी आणि ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपद गेले.
- १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा.
Ashokrao Shankarrao Chavan is an Indian politician from Maharashtra. He is son of ex-Maharashtra Chief Minister Shankarrao Chavan.
Discussion about this post