चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत (2024 Maharashtra Legislative Assembly election)आहे. भाजपने 6 जागी तर काँग्रेस ने 6 जागी उमेदवार जाहीर केले. आज रात्री झालेल्या घडामोडी नुसार काँग्रेसची यादी जाहीर झाली.
चंद्रपूर प्रवीण पडवेकर, बल्लारपूर : संतोष रावत, वरोरा : प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या 20 तारखेला मतदान होणार आहे त्यासाठी 29 ऑक्टोबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. म्हणजेच अवघ्या 2 दिवसात उमेदवारी जाहीर करून प्रचाराला लागण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपने बल्लारपूर तेथून सुधीर मुनगंटीवार यांना तर चिमूर येथे बंटी भांगडीया यांना पुन्हा उमेदवारी दिली. काँग्रेसने चिमूर येथे सतीश वारजुकर यांना, ब्रम्हपुरी येथे विजय वडेट्टीवार, राजुरा येथे सुभाष धोटे यांना पुन्हा संधी दिली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदार संघात भाजप किशोर जोरगेवार यांना तिकीट देण्यात आली आहे . 27 ऑक्टोबर रोजी भलतेच घडले. एन.डी.हॉटेल, चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आता ही जागा भाजपकडून जोरगेवार लढविणार हे स्पष्ठ झाले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून यांनी प्रवीण पडवेकर यांचे नाव जाहीर झाले आहे.
सर्वात बलाढ्य बल्लारपूर मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांना लढा देण्यासाठी काँग्रेस एका नव्या चेहऱ्याला संधी दिली. बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नावाची घोषणा रविवारी सायंकाळी झाली.
वरोरा मतदारसंघात भाजपकडून करण देवतळे यांनी तर काँग्रेसकडून प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गडचिरोली : उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये सुरु असलेला तिढा सुटला असून गडचिरोलीतून मनोहर पोरेटी यांना संधी देण्यात आली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजित कोवासे आणि मनोहर पोरेटी यांच्यामध्ये चुरस होती. अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे समजले जाणारे पोरेटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आरमोरीचा तिढा कायम आहे.
Discussion about this post