चंद्रपूर, 24 जानेवारी 2024 : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या दि. 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत पुढील वर्षासाठी नविन कार्यकारिणीसाठी निवडणूक पार पडली. यात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रशांत विघ्नेश्वर 5 मताने विजयी झाले. नियुक्तीनंतर विघ्नेश्वर म्हणाले की, “मी श्रमिक पत्रकार संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काम करेन. संघाच्या सदस्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
विघ्नेश्वर यांना 20 तर आशिष अंबाडे यांना 15 मतं मिळाली. नंतर विघ्नेश्वर यांनी कार्यकारिणी जाहीर केली. यात उपाध्यक्ष म्हणून योगेश चिंधालोरे, सचिव प्रवीण बतकी, संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य रोशन वाकडे, प्रशांत देवतळे, प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई यांचा समावेश आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष संजय तुमराम, मजहर अली, आशिष अंबाडे, महेंद्र ठेमस्कर, पंकज मोहरील, देवानंद साखरकर, कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या इतर सदस्यांनी अभिनंदन केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी सांगितले की, ते 2010 पासून चंद्रपूरात पत्रकारितेचा व्यवसाय करत आहेत. तरुण भारत, लोकशाही वार्ता आणि आता नवराष्ट्र या वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. पत्रकार संघात सदस्य पासून अध्यक्ष पर्यंत चा प्रवास संघाचे सर्व पदांना न्याय दिला. ते सध्या मध्य रेल्वेच्या ZRUCC चे सदस्य, जिल्हा शांतता समितीचे सदस्य आणि जिल्हा कर्करोग निवारण समितीचे सदस्य आहेत.
विघ्नेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी
- उपाध्यक्ष – योगेश चिंधालोरे
- सचिव – प्रवीण बतकी
- संघटन सचिव – बाळू रामटेके
- सहसचिव – एजाज अली
- कोषाध्यक्ष – सुरेश वर्मा
- कार्यकारिणी सदस्य – रोशन वाकडे, प्रशांत देवतळे,प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई
Discussion about this post