पुढील शॉर्ट लिंक कॉपी करून पोस्ट शेअर करा | https://khabarbat.in/news/9w4x
चंद्रपूर: २६ जुन रोजी वरोरा तालुक्यात आनंदवन परिसरात युवतीची हत्या झाली होती. तिचा प्रियकर प्रकरणातील आरोपीसमाधान माळी वय 26 वर्ष याला अटक करण्यात आली होती. सदर आरोपीने वरोरा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आत्महत्या केली, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
२६ जूनला आनंदवन वरोरा परिसर येथे आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 वर्ष राहणार वरोरा तिचा खून झाला होता.ज्याने खून केला तो हाच आरोपी होता, तो पोलिसांच्या कस्टडीत होता. त्याच्यावर अपराध क्रमांक 518 पब्लिक 2024 कलम 302 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याने बुटाच्या लेसने लावला गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी त्यांच्यावर पाडत ठेवण्यात आलेल्या 2 पोलिसांना निलंबित केले असल्याची माहिती आहे.
पुढील शॉर्ट लिंक कॉपी करून पोस्ट शेअर करा | https://khabarbat.in/news/9w4x
Discussion about this post