*सावित्रीबाई फुले*
क्रांती शिक्षणाची नवी
ज्योत विशाल पेटली
वसा स्त्रीच्या उद्धाराला
सावित्रीबाई भेटली
अंगावर शेण गोटे
सहन हा अत्याचार
अस्पृश्य या समाजात
नवे पेरले विचार
मुलं-मुली समानता
मिळावे सर्व हक्काने
विरोधाला लढा दिला
मनात नव्या जिद्दाने
स्त्री शिक्षणाचे प्रणेते
विधवांना दिला न्याय
बालगृह उभारून
अनाथांची झाली माय
ताठ मानेने चालण्या
शिकविले सावित्रीने
पुजनिय कार्य थोर
राबविले त्या दात्रीने
शाळा सुरू मुलींसाठी
जणू दैवत ज्ञानाच्या
सावित्रीचे गुणगान
खऱ्या ठरल्या मानाच्या
*हर्षा भुरे, भंडारा*
हर्षा भुरे, भंडारा
Discussion about this post