*ओवाळणी*
भाऊबीज
आला सण
ताई भाऊ
हर्ष क्षण..१
वाट पाही
भाऊराया
बहिणीला
लावी माया…२
पंच दिप
ताट सजे
औक्षवंत
मनी भजे…३
घास देई
लाडू छान
फळ वस्त्र
भावा दान…४
ओवाळणी
नको पैसे
पाठीराहो
पित्या जैसे…५
भाऊबीज
मांगल्याचे
बहिणीच्या
रक्षणाचे….६
सण येता
होई हर्ष
ओवाळणी
करी स्पर्श…७
*हर्षा भुरे,*
*जि.भंडारा*
Discussion about this post