khabarbat news | Chandrapur hospital | District General Hospital
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास
चंद्रपूर दि. 28 : रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना रुग्णालयात अधिक पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. तर वेतन अदा न झाल्याने डॉक्टरांच्या दुस-या संघटनेने सुरु केलेले आंदोलन सुरुच आहे. याबाबतही वरिष्ट पातळीवर चर्चा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय),चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होतांना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने दि. 1 ऑक्टोबर 2023 पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करतांना संबंधित रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकास पास वितरित करण्यात येणार आहे.
या पासच्या आधारे रुग्णांच्या नातेवाईकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच रुग्णास भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे. विनाकारण रुग्णालयामध्ये गर्दी होऊ नये, याकरीता नागरीकांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकाने हल्ला केल्याची घटना घडली. सदर घटनेचा निषेध करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टरांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या.
मागील काही दिवसांपासून अश्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले,त्यामुळे रुग्णालयांमधील डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष घालून डॉक्टरांच्या सुरक्षेकरीता आवश्यक उपाययोजना करायला हवे.
तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पगार ४ महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालून डॉक्टरांच्या दोन्ही समस्या तातडीने सोडवाव्या, अशा सूचना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.
काल बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आंदोलनकरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नंतर लगेच त्यांनी रुग्णालय आणि पोलिस प्रशासन यांच्या अधिका-यांची बैठक घेत डॉक्टरांना सुरक्षा देण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उप वैद्यकीय अधिक्षक भुषण नैताम, प्रा. डॉ मिलींद कांबळे, प्रा. डॉ प्रशांत उईक, शहर पोलिस ठाण्याचे पालिस निरिक्षक राजपूत आदींची उपस्थिती होती.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टराला रुग्णांच्या नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी कार्यवाही केली आहे. मात्र या घटणेच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात आंदोलन सुरु केले होते. याचा परिणाम आरोग्य सेवेवर दिसुन आला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाउन डॉक्टरांशी चर्चा केली. येथे पुर्ण वेळ सहाय्य पोलिस दर्जाचा अधिकारी तैणात ठेवण्यात यावा, ओपीडी मध्ये दोन पोलिसांची तैनाती ठेवण्यात यावी डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला केल्या आहे. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा करत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनतर डाॅक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.
chandrapur hospital list
govt hospital chandrapur address
chandrapur government hospital
government hospital chandrapur contact number
private hospital in chandrapur
chandrapur government hospital recruitment
civil hospital chandrapur
gmc chandrapur contact number
Discussion about this post