Free training for plastic processing and injection molding at CIPET Chandrapur
चंद्रपूर, २३ ऑक्टोबर २०२३: सिपेट चंद्रपूर आणि महाज्योती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील युवक/युवतींसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्लास्टिक प्रोसेसिंग आणि इंजेक्शन मोल्डींग या दोन अभ्यासक्रमांसाठी एकूण १५० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल.
सिपेट : सेन्ट्रल इन्स्टिटयूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनियरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी (रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन एवं उर्वरक मंत्रालय, भारत सरकार)
आणि महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपुर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रमाचा कालावधी ९६० तास (६ महिने) असून प्रशिक्षणार्थींना प्लास्टिकचे उत्पादन, प्रक्रिया आणि मशीन ऑपरेटिंग यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
इंजेक्शन मोल्डींग अभ्यासक्रमाचा कालावधी देखील ९६० तास (६ महिने) असून प्रशिक्षणार्थींना इंजेक्शन मोल्डींग मशीन ऑपरेटिंग, प्रोग्रामिंग आणि उत्पादन यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षणार्थींची निवड मुळ कागदपत्रांची तपासणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुर्णतः निःशुल्क प्रशिक्षण, जेवण आणि राहण्याची व्यवस्था सिपेट मार्फत करण्यात येईल. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी www.cipet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून किंवा QR कोडद्वारे अर्ज भरू शकतात. अधिक माहितीसाठी सिपेट चंद्रपूरच्या ९८३४३०३७७४, ८८३०३६५६०४, ९५६१८०२९१७ आणि ९८९०४७७१५७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
बेरोजगार युवक/युवतींसाठी एक चांगली संधी आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना कौशल्य विकास करून चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात.
Free training for plastic processing and injection molding at CIPET Chandrapur
Chandrapur, October 23, 2023: CIPET Chandrapur and Mahajyoti Nagpur are jointly organizing a free job-oriented skill development training program for unemployed OBC, SC, ST, and special backward class youth. Under this program, 150 trainees in total will be selected for two courses: plastic processing and injection molding.
The plastic processing course has a duration of 960 hours (6 months) and trainees will be trained in plastic production, processing, and machine operation.
The injection molding course also has a duration of 960 hours (6 months) and trainees will be trained in injection molding machine operation, programming, and production.
The selection of trainees will be done through scrutiny of original documents and interviews. The selected trainees will be provided with completely free training, food, and accommodation by CIPET. Trainees who successfully complete the training will be given job opportunities in reputed companies.
The last date to apply is October 30, 2023. Interested candidates can download the application form from the website www.cipet.gov.in or fill the application form through QR code. For more information, contact CIPET Chandrapur at 9834303774, 8830365604, 9561802917, and 9890477157.
This news is a good opportunity for unemployed youth. By participating in this training program, they can develop skills and get good job opportunities.
Discussion about this post