नागपूर, २ मार्च : मिस वर्ल्ड स्पर्धेचे (जागतिक सौंदर्यवती स्पर्धा) आयोजन याखेपेस भारतात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही सौंदर्यवतींनी शुक्रवारी संत्रानगरीतील विविध ठिकाणी भेट दिली. त्याच अनुषंगाने पश्चिम नागपूर येथील धरमपेठ भागात असलेल्या राशीधाम येथे या सौंदर्यवतींनी भेट देऊन आपल्या भविष्याचा वेध घेतला.
यात कॅरोलिना तेरेसा बैलावस्का, सिल्विहा व्हॅनेस्सा पोन्से डे लिओन सांचेझ, जेसिका गॅगेन, सिनी सदानंद शेट्टी, पॉला सांचेझ, क्रिस्टिन राईट, क्लाऊडे मनागाका मशेगो व व्हिक्टोरिआ जोसेफिन्मे डी सोबर्बो या सौंदर्यवतींचा समावेश होता. यावेळी टॅरो कार्ड रीडर सौ. रूपा अग्रवाल आणि अंकज्योतिष तज्ज्ञ सौ. सिम्पल अग्रवाल यांनी या सौंदर्यवतींशी चर्चा करत त्यांचे व्यक्तिमत्व आणि भविष्य यांबद्दल रंजक तथ्ये व अंदाज वर्तवले. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या या सौंदर्यवतींचे स्वागत राशीधामचे अजय अग्रवाल आणि अमर अग्रवाल यांनी केले.
राशीधामच्या भविष्यवेत्त्यांशी झालेली चर्चा आणि त्यांनी सांगितलेले अंदाज यानंतर सर्व सौंदर्यवतींनी प्रतिक्रिया देताना आनंद व समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात देखील वैयक्तिक बाबींवर राशीधामच्या तज्ज्ञांशी भेट किंवा सल्ला घेणे आवडेल, असेही त्यांनी सांगितले.
मिस वर्ल्ड स्पर्धेत देश-विदेशांतील स्पर्धक सहभागी होतात व अशाप्रकारे या स्पर्धकांनी नागपुरात भेट देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तब्बल २८ वर्षांच्या कालावधीनंतर ७१ वी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होत आहे. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी करणार आहे. दिनांक ९ मार्चला या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आहे. या स्पर्धेत १२० देशांच्या स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्याअगोदर या स्पर्धक भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी भेट देत आहेत.
Discussion about this post