चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील पत्रकार सूरज बोम्मावार (Suraj Bommawar) मागील २५-२६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील समस्या बातमीतून मांडल्या. या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत.

बोम्मावार यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात बारावीत असताना 1997 मध्ये केली. दैनिक सामना वृत्तपत्राची एजन्सी घेऊन पेपर वाटप सुरु केले. त्यातूनच पत्रकारितेला सुरूवात केली. पत्रकारितेचे पहिले बाळकळू सुरेश चरडे व पंकज मोहरीर यांच्या मार्गदर्शन मिळाले. त्यांनतर तरुण भारतचे तेव्हाचे जिल्हाप्रतिनिधी सुनीलजी कुहिकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. 2000 ते 2005 पर्यंत दैनिक तरुण भारत मध्ये काम केल्यानंतर 2005 ला प्रा. महेश पानसे यांच्या आग्रहामुळे 2015 पर्यंत दैनिक देशोन्नतीमध्ये पत्रकारिता केली. त्यानंतर सध्या मंगेश खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक पुण्यनगरीसाठी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सर्च टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीत व्हिडीओ बातम्या देतात. डिजिटल माध्यमात आपले स्थान निर्माण व्हावे म्हणून सावली न्यूज स्थापन केले. ते आज एस नेटवर्क या नावाने सावली तालुक्यातील अग्रगण्य न्यूजपोर्टल ठरले आहे.


सुरजजी (@SurajBommawar) यांचे शिक्षण बीए,बीजे,एम ए (जर्नलिझम), झाले असून, कृषि पदविका डिप्लोमा, ग्रंथपाल डिप्लोमा, gdca सहकार ची परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्यांची पत्रकारितेची शैली ही साधी आणि सोपी आहे. ते ग्रामीण भागातील लोकांच्या भाषेत बातम्या लिहितात. त्यांच्या बातम्यांमध्ये ग्रामीण भागातील समस्यांची सखोल माहिती असते. सावली तालुक्यातील बातम्या त्यांनी विविध वृत्तपत्रातून मांडल्या. ग्रामीण भागातील समस्या त्यांच्या बातमीतून लोकांसमोर आल्या. त्यांनी अनेक प्रश्नांची दखल घेतली आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. पण, हे करताना अनेकांसोबत वैरत्व आले. मात्र त्याहून 10 पट चांगले संबंध निर्माण झाले, असे सुरजभाऊ नेहमी सांगतात. 2007 साली त्यांच्या एका बातमीमुळे काहीजण दुखावले. काही पोलीसही निलंबित झालेत. त्याच काळात त्यांच्यावर विषप्रयोग झाला. यातून ते सुखरूप बरे झालेत आणि पुन्हा एका जोमाने पत्रकारिता केली. सावली तालुक्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य या समस्यांवर त्यांनी अनेक बातम्या लिहिल्या.
त्यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. पत्रकारांच्या हक्कासाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. या कार्यकाळात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदतर्फे नागपूर विभागातून सावलीला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्राप्त झाला. तो पालघर येथे प्रदान करण्यात आला.
ते ( Suraj Bommawar (sbommawar)) सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील लोकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. पद्मशाली समाजात जन्म झाल्याने समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून आणि जवळच्या मित्रासोबत फाऊंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. पत्रकारितेसोबतच सामान्य व्यक्तिंना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दी महाराष्ट्र अर्बन को ऑप सोसायटीची स्थापन केली. त्यातून 15 जणांना रोजगार दिला. बोम्मावार (Suraj R.Bommawar) हे एक सच्चे पत्रकार आहेत. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. ते तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी एक प्रेरणादायी आहेत.
सूरजभाऊ बोम्मावार यांचा आज 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– देवनाथ गंडाटे
Discussion about this post