चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेसच्या आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र दुपारनंतर काँग्रेस हायकमांडने उमेदवार बदलीचा निर्णय घेतला. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी धानोरकर यांनाच तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (loksabha)
उमेदवारीवरून वाद: या लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे. पोटनिवडणूक न होता 19 एप्रिल रोजी विदर्भातील पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत असतानाही काँग्रेसने उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विदर्भातील इतर सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर झाले होते, मात्र चंद्रपूरसाठी निर्णय लांबणीवर पडला होता.
दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच: दुसरीकडे, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या दोन गटांनी पत्रकार परिषद आणि पत्रकबाजीद्वारे आपापली बाजू मांडत तिकिटावर दावा सांगितला होता. भाजपकडून विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देण्यासाठी काँग्रेसने धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातून निवड करण्यात वेळ घेतला.
निष्कर्ष: प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार यांच्या गटाची नाराजी आणि भाजपकडून मजबूत उमेदवार असल्यामुळे धानोरकर यांच्यासाठी निवडणूक जिंकणे सोपे नसेल.
महादेव जानकर महायुतीतच राहणार
‘रासप’ला लोकसभेची एक जागा मिळणार
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीमध्येच राहणार आहेत. महायुतीच्या वतीने रासपला एक जागा दिली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांची देखील उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अर्थात ‘वर्षा’ बंगल्यावर जानकरांनी शिंदे-फडणवीस-पवारांची भेट घेतली
—————-
चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी नाव जाहीर
इंडिया आघाडीकडून प्रतिभा धानोरकर याना उमेदवारी
चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडी कडून काँग्रेसच्या आमदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या घोषणाची चर्चा होती. मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा काँग्रेस श्रेष्ठींनी नाव बदलल्याचे दिसून येत आहे. यादीमध्ये अद्याप पर्यंत अधिकृत घोषणा झाली नसली तरी धानोरकर यांना अधिकृत तिकीट देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
—————-
सुधीर मुनगंटीवार यांचा मुहूर्त ठरला
२६ तारखेला भरणार अर्ज
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुंनगटीवार हे २६ मार्च रोजी अकरा वाजता गांधी चौकातून नामांकन भरणार आहेत. माझी उमेदवारी हे कोणत्याही उमेदवाराच्या विरुद्ध नसून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पराजय करण्यासाठी नाही; या लोकसभेच्या विकासाचा विजय व्हावा विकासाची गती वाढावी, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. आज २४ मार्च रोजी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून चंद्रपूर, वाणी या परिसरातील पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, नामांकन भरताना माझ्यासमवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या वतीने श्री राजेंद्र जैन, शिवसेनेच्या वतीने नागपूर विभागाचे प्रमुख किरण पांडव व आरपीआय आठवले गट आरपीआय जोगेंद्र कवाडे यांचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
—————-
प्रकाश आंबेडकर यांचे अखेर ठरले
27 तारखेला अकोल्यातून अर्ज भरणार
27 तारखेला अकोल्यातून अर्ज भरणार आणि वंचित पक्षाच्या वतीने लढणार असे अखेर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. तसेच महाविकास आघाडीने दिलेल्या त्यांच्या चार जागा त्यांना त्यांच्या चार जागा परत करतोय असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यासाठी नेत्यांच्या बैठका देखील पाड पडल्या. मात्र जागावाटपाचा तिढा न सुटल्याने आंबेडकर यांनी युती तुटल्याची घोषणा केली.
————-
माझ्या उमेदवारीमुळे नागपुरात जनतेला बदल करण्याची संधी
काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
गडकरीं विरोधात लढायला कोणीच तयार नाही अशी हवा मीडियाच्या माध्यमातून पसरवली. पण, मी लढायला उभा राहिलो. मोदींनी दहा वर्षात लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. आता ते संविधान बदलण्याची भाषा करीत आहे. संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडियाचा मी उमेदवार आहे. जनतेला बदल करण्याची संधी आहे. या संधीचे सोने जनतेने करावे असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
Discussion about this post