*चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती माजी सभापती शोभाताई आखाडे यांचे निधन
नागपूर, दि. 25 : चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सावलीच्या पहिल्या महिला सभापती सौ. शोभाताई गजानन आखाडे यांचे आज 24 डिसेंबर रोजी रात्री ठीक 9.15 वाजता निधन झाले.
मागील काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
शोभाताई आखाडे सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्यांनी पंचायत समिती सावलीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच, त्या माजी जिल्हा परिषद सदस्य होत्या.
त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आशिष आणि आकाश, आणि मुलगी ज्योती मुंढे असा परिवार आहे.
अंतिमविधी 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता निफंद्रा येथे करण्यात येईल.
Discussion about this post