गडचिरोली/विष्णू वैरागडे
गडचिरोली, 24 सप्टेंबर 2023: माओवादी विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी कुरखेडा उपविभागातील बेडगाव घाट जंगल परिसरात पोलिसांनी 11.8 किलो हायएक्स्प्लोझिव्हसह 4 पांढरे मळकट रंगाचे पाऊच जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक बेडगाव घाट जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना एका संशयित जागेची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणाची तपासणी केली असता त्यांना जमीनीत खोलवर दडलेले 4 पाऊच सापडले. या पाऊचमध्ये स्फोटक पदार्थ भरलेला होता.
बीडीडीएस पथकाने या स्फोटक पदार्थाची तपासणी केली असता त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझिव्ह असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. याच विलय सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला.
दिनांक 23/09/2023 रोजीचे 11:45 वा. चे दरम्यान उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात पोस्टे पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे पुराडा पोलीस पथकासोबत असलेले डिएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने त्याबाबतची माहिती मा. अपर पोलीस अधिक्षक (अभियान) गडचिरोली यांना दिली.
मा. वरिष्ठांच्या आदेशाने गडचिरोली येथुन बीडीडीएस पथक घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांचे सहाय्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढया मळकट रंगाचे पाऊच 4 नग मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.
Gadchiroli Police has foiled a major assassination attempt by Naxalites in the wake of Maoist merger week. On September 23, 2023, the police seized 4 white colored pouches containing 11.8 kg of high explosive from Bedgaon Ghat forest area of Kurkheda sub-division.
Discussion about this post