महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर, दि. १४ सप्टेंबर २०२३:- थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या इसमाविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेशनगर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

मोहम्मद अशफाक असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहे. वारंवार सुचना करूनही प्रवेशनगर येथील वीज ग्राहक नदीम खान या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ शंकर धानोरकर आणि सहकारी आसाराम देशमुख व अशोक सहारे हे बिज बिल वसुली करण्याकरीता गेलो असता तेथे विज वापर करणारे मोहम्मद अशपाक यांना थकीत विज बिल बाबत माहिती देवुन थकीत बिल भरण्याबाबत सांगीतले असता धानोरकर यांचेशी भांडण केले आणि कॉलर पकडुन शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. सोबतच सहकारी कर्मचारी यांना देखील शिवीगाळ केली.
यासंदर्भात धानोरकर यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अशफाक यांचे विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अन्वये शासकीय कामात हस्तक्षेप आणि लोकसेवकाला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
— उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर
Discussion about this post