नागपूर : नवजीवन कॉलनी येथे नुकताच बचपन प्ले स्कूलचा शुभारंभ रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रा. डॉ. सुनीता धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या डॉ..सुनीता धोटे यांनी फीत कापून उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर बरडे, श्रीमती माया बरडे, संचालक निखिल बरडे, प्राप्ती बरडे, प्राचार्या विशाखा ठाकरे उपस्थित होत्या.
प्रास्ताविकातून प्राचार्या ठाकरे यांनी बचपन प्ले स्कूलचे वैशिष्ट्य सांगितले. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्यावर संस्कार टाकण्याचे कार्य बचपनच्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुनीता धोटे यांनी बचपन व्यवस्थापनाचे कौतुक केले. शिक्षणाचा पाया रचण्याचे काम प्ले स्कूलच्या माध्यमातून होत असते. बचपन प्ले स्कूल संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष शंकर बरडे यांनी हसत खेळत शिक्षणाचे बीज बचपन स्कूलच्या माध्यमातून पेरले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post