गोंदिया:
लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू.
वडसा-कोहमारा मार्गावरील मोरगाव टी-पॉईंटवर बुधवारची घटना.
शिवलाल चुन्नीलाल लाडे (४२, रा. निलज, ता.अर्जुनी/मोरगाव), असे मृताचे नाव.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयात पत्नीसह जात होते. मात्र, एक महत्त्वाचे दस्तावेज घरी विसरल्यामुळे शिवलाल एकटेच घरी परत जातांना हिमालया बारसमोर वडसाकडून कोहमाराकडे जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डाॅक्टरांनी शिवलाल यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पाठलाग करून नवेगाव बांधजवळ ट्रक पकडला.
Discussion about this post