**नागपूर : वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि योगा लाईफ सेंटरच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी**
नागपूर, दि. २१ डिसेंबर २०२३ – वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि योगा लाईफ सेंटरच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांची प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार, राष्ट्रीय यंगस्टार पुरस्कार, राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर संगीतप्रेमींसाठी कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असेल.
याबाबत आयोजित पत्रपरिषदेत आयोजक आणि सेंटरच्या सचिव धनश्री लेकुरवाळे यांनी सांगितले की, हा कार्यक्रम नागपूर शहरातील आणि आसपासच्या परिसरातील विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना गौरवण्यासाठी आयोजित केला जात आहे. या पुरस्कारांद्वारे विजेत्यांना त्यांच्या कार्याची दखल घेतली जाईल.
पत्रपरिषदेला आयोजक डॉ. प्रेमा लेकुरवाळे, धनश्री लेकुरवाळे, डॉ. नितीश गायकवाड आणि डॉ. प्राजक्ता लाडूकर उपस्थित होत्या.
Discussion about this post