भविष्यात शिक्षकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करू : आमदार सुधाकर अडबाले
गोंदियात १० वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन
गोंदिया : सॉफ्ट टेनिस ही एक उत्तम खेळ आहे. या खेळात शरीराला चांगला व्यायाम मिळतो. तसेच, या खेळात स्पर्धात्मकता असते. या स्पर्धेमुळे राज्यातील युवा खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ मिळत आहे. भविष्यात शिक्षकांसाठी देखील राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करू, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
सॉफ्ट टेनिस असोसिएशन गोंदिया द्वारा आयोजित १०वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२३-२४ (मुले – मुली) जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे २५ नोव्हेंबर पासून सुरू झाली. यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कदम, प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असो. सचिव रवींद्र सोनवणे, जिल्हा टेनिस असोसिएशनचे सचिव अनिल सहारे, सहसचिव मनीष मस्के, माजी विजुक्ता प्रांतीय उपाध्यक्ष शशीनिवास मिश्रा सर, विदर्भ शिक्षक संघ प्रांतीय अध्यक्ष रेशीम कापगते, अशोक नागपुरे, सूर्यकांत केंद्रे, श्री. फून्ने, संजय भास्कर, विक्की पवार, पृथ्वी रामटेके आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, हे एक चांगले लक्षण आहे की तरुण पिढीमध्ये खेळाची आवड वाढत आहे. भविष्यात शिक्षकांच्या पण राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करू असे. त्यामुळे शिक्षक देखील क्रीडा क्षेत्रात नैपुण्य होईल.
राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंचा सुद्धा यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेस राज्यातील विविध विभाग, जिल्ह्यांतून जवळपास ४० संघ सहभागी झालेले आहेत.
Discussion about this post