क्षण निरोपाचा
गहिवरे मन
अश्रू नयनात
आले विसर्जन
ढोल ताशा वाजे
जरी जल्लोषात
निरोप देताना
खंत ही मनात
दहा दिन हर्ष
गजबज घरी
सुर ताल जणू
खेळल्या लहरी
क्षण निरोपाचा
देतो तुला साद
ठेव भक्तांवर
तुझा आशीर्वाद
जा बाप्पा मोरया
देतो हा निरोप
कृपा दृष्टी ठेव
कधी नको कोप
पुढील वर्षाला
लवकर यावा
सर्व चूक भूल
माफी आम्हा द्यावा
कवयित्री हर्षा भुरे, भंडारा
Discussion about this post