*रमलो तुझ्यात….*
रमलो तुझ्यात सखे
कधी कळेल तुला
कसं सांगू तुला मी
प्रेम झालंय मला
रमलो तूझ्यात सखे
पडलो तूझ्या प्रेमात
चाहूल लागली तुझी
येना माझ्या जीवनात
रमलो तुझ्यात सखे
तूच माझ्या मनात
कर काही असं तू
भेट होईल क्षणात
ओढ लागली तुझी
मन कुठे लागेना
काय करू आता मी
मला काही कळेना
रमलो तुझ्यात सखे
ओढ लागली तुझी
तुला भेटण्यासाठी
होते धडधड माझी
*कवी अजय राऊत*
Discussion about this post