ललित लांजेवार: चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला.
चंद्रपूरकरांनी आपली पसंती पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांना दिला आहे.स्व. बाळू धानोरकर हे देखील पाहिल्याचं वेळी २०१९ च्या लोकसभेसाठी
चंद्रपूरातून भाजपच्या हंसराज अहिर यांच्या विरुद्ध निवळून आले होते. २ लाख २० हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना आणि भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
चंद्रपूर लोकसभा हा मतदारसंघ यंद्याच्या निवडणुकीत चर्चेचा विषय होता. लोकसभेची उमेदवारी नको असलेल्या सुधीर मुनगंटीवारांना नको असलेली लोकसभा तिकीट मुद्दाम पक्ष श्रेष्ठी कडून देण्यात आली आणि लढण्यास सांगितले. मात्र निवडणूक होण्यापूर्वीच चंद्रपुरातले वारे हे काँग्रेसच्या दिशेने म्हणजेच प्रतिभा धानोरकर यांच्या दिशेने धावू लागले होते. मुनगंटीवार यांना हे आधीच समजले होते की कल माझ्या विरोधात जात आहे मात्र करणार काय ?पक्षांनी एकदा पक्षाचा झेंडा हातात दिला आणि तिकीट सार्वजनिक केली तर लढणं भाग आहे.
२०२४ चे इलेक्शन हे काँग्रेससाठी अगोदरच इमोशनल वळणावर होते, त्यातच मुनगंटीवारांचे १-२ शब्द हे प्रतिभा धानोरकरांना लागले, माध्यमात चर्चा झाली.सोशल मीडिया आहे चर्चा थांबू शकत नाही.
काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्र पक्षाने देखील चांगली मदत प्रतिभा धानोरकर यांना केली. मात्र मार्केटच्या चर्च प्रमाणे वि.प.नेते यांची त्यांना साथ मिळाली नाही . अनेक वेळी ती नाराजी ताईनी बोलून दाखविली. मात्र अशी देखील चर्चा होती.वि.प.नेते यांनी भाऊंना मदत केली.मात्र २लाख ६० हजार ४०६ मतांनी प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या . या भाजपचा स्टार चेहरा असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर तयारी सुरु होती मात्र ताईंची लीड वाढतच तयारी थांबवावी लागली. काउंटिंच्या पहिल्या फेरी पासून भाऊ मतमोजणी केंद्रात आलेच नाही .तर प्रतिभा धानोरकर यांच्या बंगल्यासमोर लीड दिसतातच फटाके फुटू लागले.
२०१९ ला शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या स्व.बाळू धानोरकर यांनीही कमाल केली होती. तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत पंधरा वर्षांपासून ताब्यातील मतदारसंघ भाजपने गमावला. मात्र भाऊंच्या जाण्याने ही जागा नऊ महिन्यांपासून रिक्त होती. मात्र परत ती नुकसान भरपाइ त्यांच्या पत्नीने भरून काढली. आणि खासदार नावापुढे धानोरकर नाव परत कोरले गेले.
विशेष म्हणजे काही मतदार संघात भाऊंचा होल्ड होता. मात्र काही मतदारसंघ भाऊंची ड्राय होते,अश्या संघात त्यांना कोणताच फायदा झाला नाही.
भाऊंना माहित होते आपल्या मनाच्या विरोधात सर्व सुरु आहे. मात्र बॉसचा निर्णय निर्णय असतो.त्यांनी आपली सर्व ताकद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांना प्रचाराला बोलावले मात्र निकाल पूर्वीच समजले होते.याचा काहीही फायदा होणार नाही. पण काँग्रेसच्या नाना पटोलेंपासून सर्व नेत्यांनी धीर दिले आणि ताईनी चंद्रपूर आपल्या पदरी पाडले.
प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) 718410
सुधीर मुनगंटीवार (भाजप) 458004
राजेश बेले (वंचित) 21980
अशी मते घेतली.
विशेष म्हणजे मंत्र्यांना पाडण्याची धानोरकर कुटुंबीयांची परंपरा आहे.असे प्रतिभा ताई बोलल्या स्व.बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले होते. ताईनी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचा विधानसभेत ‘पराभव केला. आता लोकसभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले आहेत.
याशिवाय कास्ट फॅक्टर सुद्धा यंदाच्या निवळणुकीत खूप महत्वाचा ठरला. ताईंच्या खात्यात कुणबी समाजामुळे आणखी भर पडली आणि लीड मिळण्यास मदत झाली. एकूण १५ उमेदवार रिंगणात होते.
तर एकूण मतदार १८३७९०६ होते. एकूण मतदान १२४१९५२ झाले. एकूण मतदान टक्केवारी ६७.५७% इतकी झाली.
Discussion about this post