मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी युट्युबवरून दिली आहे. दरम्यान, याप्रकरणात संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किरीट सोमय्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस आली होती. या नोटीसीला उत्तरही देण्यात आलेले होते. आम्हाला पुढील 72 तास चॅनेल बंद करण्याच्या सूचना आलेल्या आहेत.
व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध | WhatsApp वर चॅनेल कसे तयार करावे?(Opens in a new browser tab
आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 72 तासांसाठी लोकशाही चॅनेल बंद करण्यात आलेलं आहे. सूचनांचे आम्ही पालन करुच, पण, आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु, आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती कमलेश सुतार यांनी दिली आहे.
Discussion about this post