नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. मोहोळ हे अधिवेशनासाठी दिल्लीत महाराष्ट्र सदनात मुक्कामी आहेत. दरम्यान, त्यांच्या वागण्यातील साधेपणा सुरक्षा यंत्रणांना अनुभवायला मिळाला आहे. ‘मला सॅल्यूट वगैरे करू नका, नमस्कार केला नाही तरी चालेल!’ असा प्रेमळ सल्ला मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र सदनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला. (Murlidhar Mohol Member of the Lok Sabha)
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सर्व खासदार दिल्लीत आहेत. त्यामुळे एरवीही सतर्क असलेली इथली सुरक्षा यंत्रणा सध्या अधिक दक्ष आहे. देशभरातील नवनवीन खासदारांची या परिसरात रोंदळ सुरु आहे. त्यातच मंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले काही चेहरेही प्रशासनाच्या दृष्टीने नवीन आहेत.
मुरलीधर मोहोळ हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पुणे मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. मुरलीधर मोहोळ यांची शैक्षणिक पात्रता पदवीधर असून त्यांनी शेती व व्यवसाय हा आपला व्यवसाय असल्याचे जाहीर केले आहे. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर राहिले आहेत. तीन दशकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली. अलीकडच्या काळात, त्यांनी विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून सामुदायिक संबंधांना सक्रियपणे प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमांमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ सारखे कार्यक्रम आयोजित करणे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहीम राबवणे यांचा समावेश आहे. मोहोळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चांगले संबंध आहेत.
Discussion about this post