Khabarbat News | CM Maharashtra – Rahul Narvekar
आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता असून, नार्वेकरांकडून महाधिवक्ता तुषार मेहतांची भेट घेण्यात आली. निश्चित केलेल्या कामकाजाच्या तारखांनुसार सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी (ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू विरुद्ध विधानसभा अध्यक्ष) ३ ऑक्टोबर रोजी, तर पक्षाचे नाव आणि चिन्ह (उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे) प्रकरणी १० ऑक्टोबर रोजी लागोपाठच्या दोन मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे.बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे या दोन्ही प्रकरणांची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी या तीन तारखा महत्वाच्या मानल्या जात आहेत.
शिवसेना 16 आमदारांच्या पात्रता प्रकरणी आता सुनावणीला वेग येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. कारण राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणी नंतर दिल्लीला गेलेत. शिवसेनेतील 16 आमदारांच्या पात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी नार्वेकर दिल्लीत कायदे तज्ञांच्या कडून सल्ला घेणार असल्याचे बोलले जात आहे मात्र नार्वेकर यांनी या वृत्ताचे खंडन केले. आपला दौरा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिलेला आहे.
या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत कायदे तज्ञांशी सल्लामसलत करण्याची शक्यता वर्तवली जाते . मात्र त्यावर नार्वेकरांनी हे उत्तर दिले आहे आणि अनेक कार्यक्रमा बैठक आहेत. त्यात मी सहभाग घेणार असल्यास कारणाने मी दिल्लीला जात आहे.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांवर चांगलेच ताशेरे ओढले. पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदार अपात्र प्रकरणात निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता कारवाईला वेग दिला आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. या निर्देशानंतर आता राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार संजय शिरसाट पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? या दोन्ही न्यायीक संस्था आहेत. यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांच्या अधिकारांवर गदा येतेय का? हाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून कदाचित या चर्चेसाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत.”
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार ठरल्यास भाजपने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे सांगण्यात येत आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या मुद्द्यावरुन वर्ष लोटलं. मात्र, तिढा सुटलेला नाहीय. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रदीर्घ काळापासून विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगावं, अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली. तेव्हा सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. मुद्दा हा आहे की ताशेरे ओढण्याची वेळ सुप्रीम कोर्टावर का आली? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसंदर्भात का उशीर लावत आहेत? विधानसभा अध्यक्ष नर्वेकरांची भूमिका योग्य आहे का?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 11 मे ला लागला. यावेळी सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपलली होती. पण सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही राहुल नार्वेकर यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सुप्रीम कोर्टाने ठराविक वेळेत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. पण अद्याप या प्रकरणावर हवी तशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली, यावेळी सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेची सुनावणी एका आठवड्यामध्ये घ्या, असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले, तसंच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. न्यायालय विधानसभा अध्यक्षांसोबतच्या सौहार्दाची गरज ओळखते, पण आम्ही न्यायालयाचा सन्मान राखला जाण्याची अपेक्षा करतो, असं परखड मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. आमदार अपात्रतेसंदर्भातल्या सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडणार? याबाबत सुप्रीम कोर्टाला दोन आठवड्यांमध्ये माहिती द्या, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना ताशेरे ओढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेताना नियमांचे उल्लंघन केले. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी अभ्यास करुन, दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण त्यानंतर बरेच दिवस या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात याआधीच्या सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली? याबाबत विचारणा केली. कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई केली याची माहिती पाठवण्याची नोटीसही बजावली.
सुप्रीम कोर्टाच्या नोटीसनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली. दोन्ही गटाकडून लेखी स्वरुपात म्हणणं मांडण्यात आलं. त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात अपात्रतेच्या प्रकरणावर प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी काही कागदपत्रे मिळाले नसल्याचा दावा करत आणखी काही वेळ वाढवून देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली.
आता प्रश्न असा आहे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची भूमिका योग्य आहे का? सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सूचना दिल्यानंतरही तीन महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणाचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. दीड वर्षांपूर्वी 600 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, अध्यक्षांनी तीन आठवड्यांसाठी हे प्रकरण पुढे ढकललं होतं, हेदेखील महत्वाचे आहे. सुनावणीसंदर्भात नार्वेकर उशीर लावत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली नाही, नार्वेकरांच्या या कारणाला विश्वासार्हता नाही. शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांनी नियमांचे उल्लंघन केले आहे हे सिद्ध झाल्यास, त्यांना या निर्णयासाठी जबाबदार धरले जाऊ शकते.
- सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलीच चपराक दिलीय. कोर्टने राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केलीय. तसेच विधानसभा अध्यक्ष हे सुनावणी का घेतली नाही, कारवाई का केली नाही, याबाबत सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच येत्या एक आठवड्यात सुनावणी घ्या, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिलाय. त्यामुळे या एका आठवड्यात राज्याच्या सत्ता संघर्षावर पु्न्हा सुनावणी होऊन अंतिम निकाल लागेल का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- लोकसभेत मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन विधेयक
- ऐतिहासिक विधेयकामुळे महिला सबलीकरणाला आणखी चालना मिळेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- 21 व्या शतक हे महिलांचं; आज विविध क्षेत्रात महिला अग्रस्थानी
- संसदीय लोकशाहीतील सुवर्णक्षण आपण एका ऐकण्यासाठी चालना मिळेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Shiv Sena MLAs disqualification: Speaker Rahul Narvekar holds meeting to review replies
- #suprime_court #rahulnarwekar #shivshena #maharastrapolitics #udhavthakkarey #ekanathshinde supreme court of india Ganesh Chaturthi | Ganeshotsav 2023 | ShivSena MLA Disqualification Hearing | Shinde Vs Thackeray | Special session of Parliament | Parliament Special Session | Manoj Jarange Patil | Maratha Reservation Meet | jalna lathi charge | Jalna Maratha Protest | Maharashtra Maratha Protest LIVE | Maratha Aarakshan | maratha reservation | Maratha Morcha | Jalna Lathicharge | One Nation One Election | Ramnath Kovind | Marathi News | India Alliance | INDIA Meeting | Rahul Gandhi LIVE | Sharad Pawar LIVE | Uddhav Thackeray LIVE | Sanjay Raut LIVE | Maharashtra Politics | chandrayaan-3 | chandrayaan | chandrayaan 3 live | isro chandrayaan 3 live link | isro chandrayaan 3 | isro chandrayaan 3 latest update | Chandrayaan-3 | onion auction | Chhagan Bhujbal | MNS Raj Thackeray live | aditya thackeray live | Sharad pawar Beed Rally | Sharad Pawar Beed Sabha | Sharad Pawar Live | Nawab Malik | Ajit pawar – Sharad Pawar | Raj Thackeray | Supriya Sule | Rahul Gandhi | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Maharashtra Political Crisis | Ajit Pawar Met Sharad Pawar | Political Crises | Maharashtra Rain Update | Monsoon News | Maharashtra Politics | Bacchu Kadu | Ajit Pawar Live | Sharad Pawar | NCP Crisis | Supriya Sule | Rohit Pawar | Maharashtra Political News | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Maharashtra Politics | NCP Ajit Pawar | Chhatrapati Sambhajinagar | Mahavikas Aghadi | Thackeray Group | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Ajit Pawar | Nana Patole | Balasaheb Thorat | Congress | NCP | BJP | Shiv Sena | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Shirsat | Sanjay Raut | Raj Thackeray | Shivsena Hearing | Pune | Nashik | Nagpur | Mumbai Marathi Live | Shinde vs Thackeray | Pune News | Nashik News | Nagpur News | Maharashtra News | Marathi News Update | Maharashtra News Update | Maharashtra Rain | TV9 Marathi Live | Maharashtra Politics | Thackeray Vs Shinde | Mansoon Update | Rahul Narvekar | Shivsena 16 MLA | Marathi Batmya Lava | Thackeray Vs Fadnavis | Monsoon News | ajit pawar news | ajit pawar live | ajit pawar latest news | sharad pawar | ncp news | ncp crisis | maharashtra politics | jayant patil | sharad pawar live | ncp latest news | ajit pawar vs sharad pawar | chhagan bhujbal | uddhav thackeray | ncp party news | maharashtra news | ncp news | ncp crisis | sharad pawar | ncp sharad pawar ajit pawar | ajit pawar news | ajit pawar latest news | Kirit Somaiya Video | maharashtra political news | sharad pawar news | Russia War | Kalank of Nagpur | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 | कांदा लिलाव | Onion auction | supreme court of india
- supreme court of india सुप्रीम
Discussion about this post