केदारनाथच्या पायी मार्गावर मोठी दुर्घटना
दगड कोसळून महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू
केदारनाथच्या पायी मारर्गावर रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मार्गावर दगड-माती कोसळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आठ जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे. बचावकार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश आहे. चिरबासा परिसराजवळच्या मार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरावरून ढिगारा आणि मोठमोठाले दगड खाली पडू लागले, असे रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले.
—————-
पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक
गृहमंत्री अमित शहा फुंकणार विधानसभेचे रणशिंग
राज्यात आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत. पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या महत्वाच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अमित शहा विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.
——-
नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली!
हैदराबाद-नागपूर विमान परत नागपुरात आलेच नाही
शनिवारी सकाळी हैदराबाद आणि लखनौहून नागपुरात येणारी दोन उड्डाणे खराब हवामानामुळे भोपाळकडे वळविण्यात आली. यापैकी हैदराबाद-नागपूरविमान भोपाळमध्ये उतरल्यानंतर नागपुरात परत येऊ शकले नाही. नागपुरात शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळावर कमी दृश्यमानतेची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ए ७४५२ हैदराबाद-नागपूर सकाळी ८.१५ वाजता भोपाळकडे वळविण्यात आले. काही वेळानंतर इंडिगो फ्लाइट क्रमांक ६ए ७४६२ लखनौ-नागपूर हेसुद्धा सकाळी ९.१५ वाजता भोपाळला नेण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पावसामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानांना उतरू दिले नाही. वास्तविक पाहता कमी दृश्यमानतेची समस्या कायम राहिली.
——-
चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत… चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरले… पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल
सुमारे तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कधी संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी या नद्यांना पूर आला. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने सुमारे ३०० घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.
————–
चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरले
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली दखल
चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
——————-
१५०० कोटी रुपये पुन्हा थकले
एसटी कर्मचाऱ्यांनी केली मागणी
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दरमहिन्यांच्या सात तारखेऐवजी उशीरा मिळत आहे तसेच संपानंतर हायकोर्टात सरकारने कबूल केल्याप्रमाणे राज्य सरकार अटी पाळत नसल्याने एसटी कर्मचारी नाराज झाले आहेत.सरकारने एसटीचे सवलत मूल्य रक्कम ही दर महिन्याला महामंडळाकडून प्रस्ताव गेल्यानंतर देण्याऐवजी ती रक्कम आगाऊ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.
——-
दिघेंचे हिंदुत्व अन् शिंदेंच्या बंडाची कथा
बहुप्रतिक्षित धर्मवीर 2 चा ट्रेलर रिलीज
एक दाढीवाला, दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला अशा डायलॉगसह बहुप्रतिक्षित धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक उपस्थित होते.
——
महाराष्ट्रातून सुरु होणार स्लीपर वंदे भारत
प्रवाशांना मिळणार सुविधा
नागपूर-पुणे मार्गावर कधीपासून स्लीपर वंदे भारत ट्रेन यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु प्रस्ताव तयार झाला आहे. या ट्रेनमुळे नागपूर ते पुणे प्रवास कमी वेळेत अधिक दर्जेदार होणार आहे. तसेच ट्रेनचा शेड्यूल आणि स्टॉपेज अजून निश्चित केले गेले नाही.भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी विविध सुविधा सुरु केल्या आहेत. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झाली आहे. यामुळे विविध मार्गांवरुन ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर येणार आहे. नागपूर ते पुणे दरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे. या संदर्भात हालचाली वेगाने सुरु आहे. नागपूर-पुणे मार्गावर गरीब रथ, अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि नागपूर-पुणे एक्स्प्रेस ट्रेन सुरु आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. यामुळे आता या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
——–
मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग तयार
मुंबईकरांचा वाचणार वेळ
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो 3 हा प्रकल्प पूर्ण करत आहे. एमएमआरसीएल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी जपानकडून सहकार्य मिळाले आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास मुंबईकरांचा वेळ चांगलाच वाचणार आहे. बईकरांना लवकरच नवीन भेट मिळणार आहे. मुंबईकर मेट्रो 3 ची वाट पाहत होते. ती लवकरच सुरु होणार आहे. 2017 पासून सुरु असणाऱ्या या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे 37 हजार कोटींचा मुंबई मेट्रो लाइन 3प्रकल्प कधीपासून सुरु होणार आहे, त्याची प्रतिक्षा मुंबईकरांना लागली आहे
Discussion about this post