• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, December 28, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home All Bharat

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Khabarbat™ by Khabarbat™
June 15, 2025
in All Bharat, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (Kedarnath Helicopter Crash) जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी (१५ जून २०२५) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेलं एक हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळील जंगलात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील संपूर्ण जयसवाल कुटुंबाचा समावेश आहे.

Uttarakhand helicopter crash | Today, at around 5:20 am, a helicopter, which was going from Shri Kedarnath Dham to Guptkashi, has been reported to have crashed near Gaurikund. There were six passengers, including the pilot (5 adults and 1 child). The passengers in the helicopter… pic.twitter.com/AVGtuxWKGj

— ANI (@ANI) June 15, 2025

वाचण्यासारखी बातमी

संवेदनेतून सेवा… लोकनेता संदीप जोशी

परमानंद तिराणीक ‘नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित

TECH TALK Unplugged :Real-world Insights on Hardware & Networking”

महेश काळे अभंगवारी कार्यक्रम पहिल्यांदाच नागपूरमध्ये’

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (7 Dead In Chopper Crash Near Kedarnath) जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच SDRF व NDRF च्या टीम्स तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. नेपाली महिलांनी जंगलात घास कापताना अपघाताची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळ अतीव दुर्गम जंगलात असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau) करणार आहे. सध्या सर्व हेली सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील वणी येथील संपूर्ण कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे. यामधील २३ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. संबंधित यंत्रणा आता अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. वणी येथील राजकुमार सुरेश जायसवाल हे कोळशाचे मोठे व्यापारी असून, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 दरम्यान अवघ्या विदर्भाचे लक्ष केंद्रित करणारा ऐतिहासिक ‘काशी शिवमहापुराण’ वणी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीचा कार्यक्रम जयस्वाल यांच्यातर्फे त्यांच्या पुढाकारणे आयोजित करण्यात आला होता.

या दुर्घटनेत राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल, आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, या कुटुंबाचा चिमुकला मुलगा विवान सध्या पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबलेला असल्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला.  मृत्यूमुखी पडलेली चिमुरडी काशी हिचे नामकरण एक वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. तिच्या नावावरून वणीमध्ये काही महिन्यांपूर्वी काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाच्या आधारे करण्यात आले होते. जयस्वाल कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे वणी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक सोशल मीडियावरही शोक व्यक्त करत आहेत.

मृत व्यक्तींची माहिती:
कॅप्टन राजबीर सिंह चौहान – पायलट, रहिवासी जयपूर

विक्रम रावत – बीकेटीसी कर्मचारी, रहिवासी रासी, ऊखीमठ

विनोद देवी – वय 66, रहिवासी उत्तरप्रदेश

तृष्टि सिंह – वय 19, रहिवासी उत्तरप्रदेश

राजकुमार सुरेश जायसवाल – वय 41, रहिवासी वणी, यवतमाळ (महाराष्ट्र)

श्रद्धा राजकुमार जायसवाल – पत्नी, रहिवासी वणी, यवतमाळ

काशी जायसवाल – वय 23 महिने, कन्या, रहिवासी वणी, यवतमाळ

The helicopter was flying from Kedarnath to Guptkashi. Seven dead, confirms Badri-Kedar Temple committee chief Hemant Dwivedi. The deceased included a 10-year old.

Post Views: 557
Tags: NagpurVidarbhawani
SendShareTweetScan
Previous Post

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

Next Post

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

November 21, 2025
0
ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार; 15 कोटींची….

September 26, 2025
0
TGPCET, Nagpur Organizes Campus Recruitment Drive for Transrail Lighting Ltd.

TGPCET, Nagpur Organizes Campus Recruitment Drive for Transrail Lighting Ltd.

September 22, 2025
0
PM Modi Speech Today Live Updates: Medicines, insurance and daily essentials to get cheaper under GST reforms, says PM Modi

PM Modi Speech Today Live Updates: पीएम मोदी का जीएसटी को लेकर बड़ा फैसला; कहा – यह “बचत उत्सव”

September 21, 2025
0
Load More
Next Post
‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

'ती' बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती.....भीतीमुळे स्थलांतर

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

Mavericks Team Reinstalled at Tulsiramji Gaikwad-Patil College; Infosys Expert Guides Students on Career Readiness Session

December 19, 2025
गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

गोंदिया जिल्ह्यात बुधवारला होणार परीक्षा

November 25, 2025
राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

राजकीय नेते हाताला धागा का बांधतात? असे होतात राजकीय जीवनात फायदे

November 25, 2025
प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

प्रभाग ११ मध्ये शिवसेना (शिंदे) चा दणदणीत प्रचार…

November 23, 2025
किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

किशोर तरोणे व अंजनाबाई खुणे यांची युथ आयकॉन पुरस्कारा साठी निवड; शनिवारी होणार वितरण.

November 21, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा