वरोरा/भद्रावती, : डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या पुढाकाराने वरोरा – भद्रावती मतदारसंघात मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. मागील तीन महिन्यांपासून मतदार संघातील खेमजई, खांबाडा, माढेळी, माजरी, चंदनखेडा आणि आता अलीकडेच टेम्बूर्डा या गावांमध्ये नेत्रदोष तपासणी, औषोधोपचार आणि चष्मे वाटप हा उपक्रम पूर्णपणे विनामुल्य राबविण्यात आला. या शिबिरांच्या माध्यमातून आजवर जवळपास सात हजार सातशे आठशे हून अधिक नागरिकांना दृष्टीसेवा प्रदान करण्यात आली. या शिबिरांतिल लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत, त्यातल्या त्यात बहुसंख्य लाभार्थी वयोवृध्द व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत , हि सेवा स्वतःच्या स्तरावर प्राप्त करून घेण्याची क्षमता नसलेल्या घटकातून आहेत. यामुळे सदर उपक्रम खर्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे. डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या जनसंपर्काचा हा अभिनव प्रकार जनहिताचा असुन ‘जनसेवेतून जनसंपर्क’ खर्या अर्थाने रूढ होतांना दिसून येत आहे.
या शिबिरातून केवळ दृष्टीदोष दूर करण्याचे काम झाले नाही, तर या मतदारसंघाला विकासाची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्नही सुरू आहे, असे डॉ. खुटेमाटे यांनी सांगितले.
त्यांनी या भागात आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांच्या विकास तथा जनसामान्यांच्या रोजच्या आयुष्यातील कष्टप्रद आणि इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडविण्याच्या प्रयत्न करण्याचे वचन दिले.
डॉ. चेतन खुटेमाटे हे उच्च शिक्षित , संवेदनशील , अष्टपैलू व्यक्तिमत्व आहें .मुळातच भद्रावती- वरोरा मतदार संघातील पिपरी गावच्या शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकर्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे हा त्यांच्या वैयक्तिक जिव्हाळ्याचा विषय आहे.
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविलेला आहे. अनेक गरीब आणि गरजू ग्रामीण नागरिक , चेहऱ्यावर समाधानाचे हास्य घेऊन शिबिरात उपस्थित असतांना बघून समाजात एक वेगळा विचार रूढ होत आहे. मागील वीस वर्षात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवा करीत असलेले डॉ. खुटेमाटे यांनी जनसेवेचे हे उपक्रम आयुष्यभर अविरत पणे राबविणारच असल्याची ग्वाही दिली.
Discussion about this post