काँग्रेसकडून 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
मुंबई, – काँग्रेसने विधानसभेसाठी 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत काँग्रेसने पहिल्या यादीत 48, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची, अशी एकूण 106 जणांच्या नावांची घोषणा केली आहे.
काँग्रेसच्या चौथ्या यादीत अमळनेर – अनिल शिंदे, उमरेड – संजय मेश्राम, आरमोरी – रामदास मश्राम, चंद्रपूर – प्रवीण पडवेकर, बल्लारपूर – संतोषसिंह रावत, वरोरा – प्रवीण काकडे, नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफार, ओरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे, नालासोपारा – संदीप पांडेय, अंधेरी पश्चिम – अशोक जाधव, शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट, पुणे छावणी – रमेश बागवे, सोलापूर दक्षिण – दिलीप माने, पंढरपूर – भगिरथ भालके यांचा समावेश आहे.
मनसेची 32 उमेदवारांची सहावी यादी जाहीर
मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. या अनुषंगाने मनसेने 32 उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. मनसेने सहाव्या यादीपर्यंत 117 उमेदवार जाहीर केले आहेत.
सहाव्या यादीत नंदुरबार – वासुदेव गांगुर्डे, मुक्ताईनगर – अनिल गंगतिरे, सावनेर – घनश्याम निखोडे, नागपूर पूर्व – अजय मारोडे, कामठी – गणेश मुदलियार, अर्जुनी मोरगाव – भावेश कुंभारे, अहेरी – संदीप कोरेत, राळेगाव – अशोक मेश्राम, भोकर – साईप्रसाद जटालवार, नांदेड उत्तर – सदाशिव आरसुळे, परभणी – श्रीनिवास लाहोटी, कल्याण पश्चिम – उल्हास भोईर, उल्हासनगर – भगवान भालेराव, आंबेगाव – सुनील इंदोरे, संगमनेर – योगेश सूर्यवंशी, राहुरी – ज्ञानेश्वर गाडे (माऊली), नगर शहर – सचिन डफळ, माजलगाव – श्रीराम बादाडे, दापोली – संतोष अबगुल, इचलकरंजी – रवी गोंदकर, भंडारा -अश्विनी लांडगे, अरमोरी – रामकृष्ण मडावी, कन्नड – लखन चव्हाण, अकोला पश्चिम – प्रशंसा अंबेरे, सिंदखेडा – रामकृष्ण पाटील, अकोट – कॅप्टन सुनील डोबाळे, विलेपार्ले – जुईली शेंडे, नाशिक पूर्व – प्रसाद सानप, देवळाली – मोहिनी जाधाव, नाशिक मध्य – अंकुश पवार, जळगाव ग्रामीण – मुकुंदा रोटे, आर्वी – विजय वाघमारे यांचा समावेश आहे.
शिवसेनेची दुसरी २० उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई, – विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने दुसरी २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अक्कलकुवा – आमश्या पाडवी, बाळापूर – बळीराम शिरसकर, रिसोड – भावना गवळी, हदगाव – बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण – आनंद तिडके पाटील (बोंडारकर), परभणी – आनंद शेशराव भरोसे, पालघर – राजेंद्र गावित, बोईसर – विलास तरे, भिवंडी ग्रामिण – शांताराम मोरे, भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी, कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, अंबरनाथ – डॉ बालाजी किणीकर, विक्रोळी – सुवर्णा करंजे, दिंडोशी – संजय निरुपम, अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल, चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते, वरळी – मिलींद मुरली देवरा, पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे, कुडाळ – निलेश नारायण राणे, कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर यांचा समावेश आहे. शिवसेनेने पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २०, अशी एकूण ६५ जणांची यादी आतापर्यंत जाहीर केली आहे.
Discussion about this post